CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant : राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांसाठी खुशखबर...! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत स्वयंपूर्ण मित्र कार्यरत आहेत
Published on

CM Pramod Sawant : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. स्वयंपूर्ण मित्रांना सरकारतर्फे बोनस देण्यात येणार आहे. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात तालुका नोडल अधिकारी आणि 'स्वयंपूर्ण मित्र यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant : 'नमो' सारखं आता 'सीएम ॲप', मुख्यमंत्री सावंत यांचे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शंभर स्वयंपूर्ण मित्रांना वार्षिक कामगिरीचा आढावा घेवून बोनस देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाच्या पुढाकाराने पारंपारिक उद्योगाच्या पुर्नजन्मासाठी निधी योजनेअंतर्गत सर्व बाराही तालुक्यांमध्ये क्लस्टर्स स्थापना करण्याच्या सरकारच्या योजनेचीही घोषणा या प्रसंगी केली.

CM Pramod Sawant
Canacona News: तवडकरांची दोन दिवसांत दोन मंत्र्यांची भेट; आता रेल्वेमंत्र्यांनी दिले मोठे आश्वासन

"राज्यात सध्या एकूण 210 स्वयंपूर्ण मित्र आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत काम करीत आहेत. विविध कार्यक्रमांत त्यातील निवडक मित्रांचाच गौरव करण्यात येतो.

परंतु, इतर अनेक स्वयंपूर्ण मित्र स्वत:ची वाहने, पैसा खर्च करून सुट्टीच्या दिवशीही प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. त्यामुळेच यंदा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शंभर स्वयंपूर्ण मित्रांना बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे", असे मुख्यमंत्री म्हणाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com