Solapur Hit and Run Dainik Gomantak
गोवा

Solapur Hit and Run - सोलापूर येथे ‘हिट अँड रन’मध्ये गोव्यातील महिलेने गमावला जीव

Solapur Road Accident: रेवोडातील वारकरी महिलेचा सोलापूर मार्गावर अपघाती मृत्यू, अन्य दोघे वारकरी जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Solapur Accident:

अस्नोड्यामधून पायी वारीतून पंढपूरला गेलेल्या रेवोडा येथील गौरी कुडतरकर यांचा सोलापूर मार्गावर अपघातात मृत्यू झाला. पाय दुखू लागल्याने विश्रांतीसाठी बसलेल्या वाहनावरच पाठीमागून कारने धडक दिली. यात गौरी यांचा मृत्यू झाला, तर सुरेखा आणि साबाजी हे जखमी झाले. चालक अर्शिद पारिड्डा याला अटक केली आहे. अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांनी अपघातस्थळी धाव घेतली. गौरी कुडतरकर या आषाढी एकादशीनिमित्त अस्नोडा ते पंढरपूर पायी वारीसाठी निघाल्या होत्या. कुडतरकर या विठ्ठलाच्या भक्त असून, घरी हरिपाठ उपासना करायच्या. यंदाचे हे वारीचे दुसरे वर्ष होते. सामाजिक कार्यात त्या सक्रिय असायच्या. पतीचे निधन झाले असून, त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. गौरी यांच्या पार्थिवावर गोव्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT