Dainik Gomantak
गोवा

...म्हणून मोन्सेरात दाम्पत्यावरील खटला लांबणीवर

न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे हा खटला लांबणीवर गेल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणी मोन्सेरात दाम्पत्यासह इतरांविरुद्ध म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात होणारी सुनावणी अखेर लांबणीवर पडली आहे. सुनावणी देणारे न्यायाधीश कोरोनामुळे आजारी असल्यामुळे हा खटला लांबणीवर गेल्याचे म्हटले जात आहे. जर आज सुनावणी पार पडली असती, आणि न्यायालयाने काही निकाल दिला असता, तर नक्कीच मोन्सेरात दाम्पत्याच्या उमेदवारीवर याचा परिणाम झाला असता. पण आता या खटल्याची सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने मोन्सेरात दाम्पत्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. याप्रकरणी आरोपपत्र निश्‍चितीच्या आदेशाला दिलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून त्यावरील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले होते.

या घटनेचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) करून बाबुश मोन्सेरात (Babush Monserrate), जेनिफर मोन्सेरात यांच्यासह इतर 35 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. त्यावरील प्राथमिक सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चितीचा आदेश जारी केल्यावर त्याला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले होते. पहिल्यांदा ही आव्हान याचिका फेटाळण्यात आल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा फेरयाचिका सादर केली गेली आणि उच्च न्यायालयाने त्यात स्थगिती दिली होती.

सात वर्षे उलटून गेली तरी या याचिकेवर सुनावणीच झाली नसल्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी अर्ज सादर करून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब निदर्शनास आणून दिली होती. राजकारण्यांवरील खटल्यांची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेण्याचे निर्देश देणारा निवाडा दिलेला आहे. स्थगिती सहा महिन्यापुरती असते मात्र स्थगिती दिलेली याचिका कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.

उच्च न्यायालयाने याचिकांवरील सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी विनंती रॉड्रिग्ज यांनी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Goa assembly Elections) खटल्यातील संशयित बाबुश मोन्सेरात व जेनिफर मोन्सेरात हे भाजपचे उमेदवार आहेत. ते पणजी व ताळगावमधून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रचाराच्या काळात हा खटला सुनावणीस आल्याने त्यांना त्यावेळी न्यायालयात हजेरी लावण्याची आवश्‍यकता भासणार आहे.

काय आहे प्रकरण?

19 फेब्रुवारी 2008 रोजी बाबूश मोन्सेरात यांनी कार्यकर्त्यांसह पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. एका तरुणाला मारहाणप्रकरणी संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून (Goa Police) त्याची दखल न घेतल्याने पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, हिंसक कार्यकर्त्यांच्या जमावाने पोलिस स्थानकाबाहेर संरक्षक भिंत तयार करून उभ्या असलेल्या पोलिसांवर प्लास्टिक बाटल्या तसेच दगडफेक करून हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर सर्व नेते व कार्यकर्ते तेथून पसार झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT