वासनाकांड काँग्रेससाठी ‘बुमरॅंग’ की वरदान ?

2012 व 2017 सालच्या निवडणुकांमध्ये संकल्पना मिलिंदकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.
Milind Naik and Sankalp Amonkar
Milind Naik and Sankalp Amonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मिलिंद आणि संकल्प हे मुरगावातील जुने राजकीय प्रतिस्पर्धी. 2012 व 2017 सालच्या निवडणुकांमध्ये संकल्पना मिलिंदकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संकल्पचे प्रथम ‘टार्गेट’ हे मिलिंदच असायचे. त्यातलेच हे एक वासनाकांड. पण हे प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर उजेडात आल्यामुळे त्याला राजकीय वास येऊ लागला होता.

Milind Naik and Sankalp Amonkar
गोव्यात शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

काही पुरावे सादर करून संकल्पनी मिलिंदविरुद्ध तक्रारही नोंद केली होती. त्यामुळे मिलिंदना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचबरोबर या प्रकरणातील तथाकथित पीडितेने संकल्पविरुध्दच तक्रार केली. हे पाहता या प्रकरणात ‘काय पाणी मुरते’ हे कळायला मार्ग नव्हता. आता तर सर्व चौकशी करून पोलिसांनी मिलिंदना निर्दोष ठरविल्याचे दिसते. हे पाहता हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संकल्पवर ‘बुमरॅंग’ तर होणार नाही ना, असे वाटते. खरे तर या प्रकरणापूर्वी मुरगावात संकल्पचे पारडे थोडे जड वाटत होते. यावेळी संकल्प बाजी मारणार, अशी चिन्हे होती. त्यात हे प्रकरण आल्यामुळे आता संकल्पना पर्याय नाही, असेही वाटू लागले आहे. मिलिंदमुळे भाजपही ‘बॅकफुट’वर गेल्यासारखा वाटत होता. मिलिंदना उमेदवारी द्यावी की नाही यावरही ‘खल’ चालल्याचे कळत होते. पण आता मिलिंदाना मैदान मोकळे झाले असून त्यांना भाजपची उमेदवारीही जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी प्रकरणे येणे म्हणजे त्याला ‘निवडणूक स्टंट’ असेच म्हटले जाते. तरीही यंदाच्या निवडणुकीत (Election) हे प्रकरण भाजपच्या अंगलट येऊ शकले असते.

Milind Naik and Sankalp Amonkar
डिचोलीत भाजपच्या बैठकीत खडाजंगी

1989 सालच्या प्रकरणाला उजाळा

मागे 1989 साली तत्कालीन सभापती दयानंद नार्वेकर यांच्याविरुध्दचे विनयभंग प्रकरण तर प्रचंड गाजले होते. त्यावेळी नार्वेकरांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी निवडणुकीत निसटत्या फरकाने का होईना; पण नार्वेकरांना पराभव स्वीकारावा लागला. मजा म्हणजे निवडणुकीनंतर हे प्रकरण तसेच ‘गुलदस्त्यात’ पडून राहिले. त्यामुळे यात खरी काय ‘मेख’ आहे हे अजूनही उकललेले नाही. याचकरिता हा त्यावेळचा एक ‘राजकीय स्टंट’ होता, असेच म्हटले जात होते. त्यावेळचे ते विनयभंग प्रकरण व आताचे हे वासनाकांड प्रकरण यात फरक एवढाच, की तेव्हा हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

Milind Naik and Sankalp Amonkar
गुरुवारी गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट 40.88% तर रिकव्हरी रेट 88.2%

संकल्पची हवा टिकणार?

संकल्पनी यापूर्वी जी ‘हवा’ निर्माण केली होती, ती टिकते की काय, याचेही अवलोकन करावे लागेल. मुरगावात मिलिंद परत निवडून येऊ शकतात की काय, याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष असेल. मुख्य म्हणजे मुरगावात (Murgao) मिलिंदची राजकीय ताकद बरीच आहे. याचा प्रत्यय या वासनाकांडाचा आरोप झाल्यानंतर मिलिंदच्या समर्थनाकरिता जमलेल्या नागरिकांनी आणून दिला होता. आता तर त्यांना अधिकच बळ प्राप्त होणार आहे. याउलट कॉंग्रेसची (Congress) स्थिती होऊ शकते. आता ‘बुमरॅंग’मुळे खरेच कॉंग्रेस ‘बॅकफुट’वर जाते, की मिलिंद नाईक परत बाजी मारणार, याचे उत्तर काही दिवसांतच मिळणार, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com