सावित्री कवळेकरांनी उभारला सांगेत बंडाचा झेंडा!

अपक्ष लढणार : भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा
Savitri Kavlekar and Pramod Sawant
Savitri Kavlekar and Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: भाजपने (BJP) माझ्या कार्याची दखल न घेता एकाच घरात दोन तिकिटे देता येणार नाहीत, असे सांगितले. प्रत्यक्षात भाजपने एकाच घरातील दोन सदस्यांना तिकिटे दिली आहेत. मात्र, मला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. या निर्णयाविरुद्ध माझ्या कार्यकर्त्यांनी मला अपक्ष निवडणूक लढविण्याचा (Goa Election 2022) आग्रह केला. कार्यकर्त्यांचा निर्णय सर्वोच्च मानून भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी सांगे येथील गुरुकुल सभागृहात पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष, भाजप गट उपाध्यक्ष सदानंद गावडे, सरचिटणीस सुदेश भंडारी, प्रशांत गावकर, माजी अध्यक्ष आनंद नाईक, एसटी मोर्चा अध्यक्ष महेश गावकर, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, संगमेश्वर नाईक, चंदन उनंदकर, मनोज पर्येकर, चंद्रकांत गावकर, माजी सरपंच संतोष गावकर, नानू भांडोळकर, माजी नगराध्यक्ष चांगुणा साळगावकर, पांडुरंग तारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Savitri Kavlekar and Pramod Sawant
'भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्रित यावे'

सदानंद गावडे म्हणाले, भाजपने चुकीचा निर्णय घेतला असून त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागणार आहे. दिला. मेशू डिकॉस्ता म्हणाले, भाजपने पराभूत उमेदवाराला पुन्हा तिकीट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याची परतफेड म्हणून पालिका क्षेत्रातून मताधिक्य मिळवू. यावेळी नगरसेवक संगमेश्वर नाईक, चंदन उनंदकर, महेश गावकर यांनीही कवळेकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

सांगेत इतिहास घडविणार

नवनाथ नाईक म्हणाले, भाजप नेता या नात्याने मी सावित्री कवळेकर यांच्यासोबत कार्य केले म्हणून मला मंडळ अध्यक्ष पदावरून हटवले. पण आज सावित्री कवळेकर यांना डावलले म्हणून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. याचा परिणाम पक्षावर होणार नाही का, असे विचारले असता, तो विचार पक्षाने करायला हवा होता. आम्ही आता फक्त कार्यकर्त्यांचा विचार करून अपक्ष निवडणूक लढवून एक महिला आमदार म्हणून सांगे मतदारसंघात इतिहास घडविणार आहोत, असे नाईक म्हणाले.

Savitri Kavlekar and Pramod Sawant
डिचोलीत भाजपच्या बैठकीत खडाजंगी

राखीवता देणाऱ्यांनीच डावलले

यावेळी सावित्री कवळेकर म्हणाल्या, महिलांना राखीवता देणार असे, सांगत असतानाच एका महिलेला डावलले, याचे दुःख कार्यकर्त्यांना झाले. कार्यकर्त्यांनाच मी सर्वोच्च मानले आहे. त्यांचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत नाकारणे मला शक्य नसल्याने सांगेतून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर मी नक्कीच विजयी होणार, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com