Pilerne Fire Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: पिळर्ण येथील आग विझविण्यासाठी तब्ब 4 टन फोमसह 'इतके' लाख लीटर पाण्याचा वापर...

फायर ब्रिगेडसह नौदल, मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

Akshay Nirmale

Pilerne Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या कंपनीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आले आहे. फायर ब्रिगेड, संरक्षण विभाग, नौदल, मुरगाव पोर्ट ट्रस्ट अशा विविध विभागातील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

ही आग इतकी भीषण होती की या आगीत बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. कंपनीचे प्रोसेसिंग युनिट पुर्णतः जळून खाक झाले आहे. आगीचे कारण कळू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. रंगांमुळे आणि त्यातील रसायनांमुळे ही आग आणखी भडकली. गोव्याच्या इतिहासातीली ही एक भीषण आग असल्याचे बोलले जात आहे. या आगीत 40 दुचाकी भस्मसात झाल्या असून कंपनीचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व अग्निशमन विभागांतील सुमारे 40 बंब ही आग विझविण्याचे प्रयत्न करत होते. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांसह येथे नौदल, संरक्षण विभाग आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट अशा विविध विभागातील मिळून 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली आहे. आग विझविण्यासाठी तब्बल 4 टन फोम आणि 12 लाख लीटर पाण्याचा वापर केला गेला आहे. दरम्यान, अजुनही येथे आग पुर्णतः विझविण्याचे काम सुरू आहे अशी माहिती, उत्तर गोव्याचे सहाय्यक विभागीय अधिकारी, अजित कामत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत अडीच किलोमीटर परीघातील लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. तसेच ज्यांना श्वसनाचा त्रास होतोय, त्यांनी तातडीने उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयात दाखल व्हावे, मास्कचा वापर करावा, घटनास्थळी फिरकू नये, असे आवाहन केले होते. या आगीची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT