Pilerne Berger Fire, Yuri Alemao
Pilerne Berger Fire, Yuri Alemao Dainik gomantak

Pilerne Berger Fire: CM आपत्ती नियोजनाकडे लक्ष द्या; आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा - आलेमाव

मुख्यमंत्र्यांनी इव्हेंट करण्यापेक्षा आपत्ती नियोजनाकडे लक्ष द्यायला हवं.

Fire in Goa Paint Factory: पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याने कंपनीचे गोदाम या दुर्घटनेत जळून खाक झाले. यात कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. (Pilerne Berger Fire)

रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao) यांनी केली आहे.

Pilerne Berger Fire, Yuri Alemao
Pilerne Berger Fire: पिळर्णच्या 2km परिघातील नागरिकांसाठी Advisory जाहीर, मदतीसाठी यांना संपर्क साधा

काय म्हणाले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव?

"पिळर्ण येथील आगीची घटना डोळे उघडणारी आहे. मुख्यमंत्र्यांनी इव्हेंट करण्यापेक्षा आपत्ती नियोजनाकडे लक्ष द्यायला हवं. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत देखील टाईम बॉम्ब असल्याचे मी मागील विधानसभा अधिवेशनात बोललो होतो.

पिळर्ण येथील आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी केली जावी. अशी मी मागणी करतो. याच समितीकडून सर्व औद्योगिक क्षेत्राची आगीच्या घटनांशी लढण्याची तयारी आणि सज्जता तपासणी केली जावी."

Pilerne Berger Fire, Yuri Alemao
Zuari Bridge: गुगल मॅप गंडलंय! गोवा एअरपोर्टने सांगितले चूक दुरूस्त करा

दरम्यान, बर्जर कंपनीत मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास लागली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळ्या धुरांचे लोट आकाशात सातत्याने जात होते. हे धुराचे लोट घटनास्थळापासून दहा ते बारा किलोमीटरपर्यंत पसरले होते. या धुराचे लोट लगतच्या साळगाव, पर्वरी, कांदोळी तसेच पणजी, ताळगाव परिसरातूनही दिसत होते.

आग लागल्याचे लक्षात आले, तेव्हा कंपनीच्या गोदामामध्ये काम सुरू होते. एकूण 94 कामगार यावेळी कामावर होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com