Goa Fire News: गेल्‍या काही वर्षांतील भीषण आगीच्‍या काही दुर्घटना

2006 मध्‍ये कुंडईत लागली होती भीषण आग; त्‍यावेळीही ‘बर्जर बेकर’ कंपनी ठरली होती लक्ष्‍य
Goa Fire News | Fire in Goa Paint Factory
Goa Fire News | Fire in Goa Paint FactoryDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fire News: पिळर्ण येथे रंग बनविणाऱ्या ‘बर्जर बेकर’ या कंपनीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू होते. (Fire in Goa Paint Factory)

या घटनेमुळे पंधरा वर्षांपूर्वी म्‍हणजे 2006 साली 28 एप्रिलला कुंडई औद्योगिक वसाहतीत याच कंपनीच्या युनिटला लागलेल्या आगीच्या घटनेच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या.

बर्जर बेकर कंपनीला लागलेल्या आगीनंतर मागील काही कंपन्यांच्या घटना डोळ्यांसमोरून तरळून जातात. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुंडईत याच कंपनीच्या कारखान्याला लागलेली आग. त्या घटनेला आता 16 वर्षे झाली आहेत.

कुंडईतील कारखान्यास आग लागल्यानंतर काही कोटींचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. शिवाय आग विझविण्यासाठी पणजी, मडगाव व फोंडा येथून अग्निशामक दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते. बर्जर हा रंग उद्योगातील ब्रँड आहे.

मागील काही काळात अनेक कंपन्या आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडल्‍या आहेत. त्यात प्रामुख्याने सांज झुजे दी आरियाल-नेसाय येथील मे. टेक फोर्स कम्पोझिट्स या कंपनीला 2019 मध्ये आग लागली होती. त्‍यात कंपनीचे 2.5 कोटींचे नुकसान झाले होते.

Goa Fire News | Fire in Goa Paint Factory
Pilerne Fire: आगीचे स्वरूप भीषण; अडीच किलोमीटर परिसरातील लोकांचे स्थलांतर

याच वर्षात वेर्णा येथील मे. समर्थ वूड वर्क्स एजन्सीला लागलेल्या आगीत दोन कोटींची हानी झाली होती. दरम्‍यान, राज्यात 24 औद्योगिक वसाहती आहेत. पिळर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 124 हून अधिक लहानमोठ्या कंपन्या आहेत.

मागील काही वर्षांतील आगीच्‍या काही घटना

आगीच्या मागील घटनांमध्ये प्रामुख्याने कोलवाळ येथील भंगारअड्ड्याला गेल्या महिन्यात लागलेली आग दोन दिवस धुसमत होती. ही आग विझविण्यासाठी 350 पाण्याचे बंब लागले. विशेष बाब म्हणजे आठ हजार चौ. मी. जागेत पसरलेल्या चार भंगारअड्डांना आग लागली होती.

तत्पूर्वी दोन महिन्यांपूर्वी कळंगुट किनाऱ्यावर दोन शॅक्सना आग लागून 50 लाखांचे नुकसान झाले होते. तसेच करासवाडा-म्हापसा येथील दिनेश हरमलकर यांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.

त्यात 70 लाखांचे नुकसान झाले. दक्षिण गोव्यात 5 जानेवारीला गांधी मार्गेट परिसरातील रफीक बेपारी यांच्या घराला आग लागून तीन लाखांची वित्तहानी झाली होती. शिवाय सोनसोडा कचरा प्रकल्पालाही आग लागली होती.

Goa Fire News | Fire in Goa Paint Factory
Mahadayi Water Dispute: म्हादई लढा ठरेल आगळा वेगळा!

बार्देश तालुक्यात तिसऱ्यांदा लोट : बार्देश तालुक्यात 28 डिसेंबर 2002 रोजी करासवाडा येथील भंगारअड्डयांना लागलेल्या आगीमुळे दोन दिवस धुरांचे लोट म्हापसावासीयांनी अनुभवले. अगदी पर्वरीपर्यंतच्या लोकांना आकाशातील धुरांचे लोट पाहायला मिळत होते.

त्यानंतर काल 9 जानेवारी 2023 रोजी गिरी येथील शेतातील गवताला लागलेल्या आगीने धुराचे लोट पुन्हा म्हापसावासीयांनी अनुभवले. आज 10 रोजी बर्जर बेकर कंपनीला लागलेल्या आगीने तिसवाडी व बार्देश तालुक्याला धुराच्‍या लोटांनी लपेटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com