Daboli Airport Dainik Gomantak
गोवा

Tourist in Goa: गोव्यात गेल्या 6 महिन्यात आले 'इतके' लाख परदेशी पर्यटक; एकूण 341 चार्टर विमाने दाखल

गेल्या काही वर्षातील संख्येपेक्षा अधिक संख्येने पर्यटकांची विमाने दाखल

Akshay Nirmale

Tourist in Goa: कोरोना महारोगराईचा निर्बंधाचा काळ लोटल्यानंतर गेल्या दोन वर्षात गोव्यातील पर्यटन उद्योग पुन्हा उभारी घेत आहे.

गेल्या 6 महिन्यात परदेशी पर्यटकांना घेऊन तब्बल 341 चार्टर विमाने राज्यात आल्याची माहिती आहे. ही संख्या या आधीच्या पर्यटन हंगामात राज्यात आलेल्या चार्टर विमानांच्या संख्येहून अधिक आहे.

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सुमारे एक लाख परदेशी पर्यटक चार्टर फ्लाईट्सद्वारे गोव्यात आल्याचा अंदाज आहे.

दाबोळी विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विदेशी पर्यटकांना घेऊन जाणारी एकूण 341 चार्टर उड्डाणे राज्यात दाखल झाली.

2022-23 च्या हिवाळ्यात राज्यात एअरोफ्लॉट, एअरो नोमॅड, अर्किरा, अझुर एअरलाईन्स, टीयुआय, एससीएटी एअरलाईन्स आणि वर्ल्ड टु फ्लाय हे सात परदेशी चार्टर ऑपरेटर कार्यरत होते. 28 मार्चपर्यंत या ऑपरेटर्सनी सेवा दिली आहे. पैकी एअरोफ्लॉट उन्हाळ्यातही कार्यरत आहे.

गोव्यात रशिया, कझाकस्तान, जर्मनी, इस्रायल, किरगिझस्तान, यूके, युरोप आणि मध्य पूर्व या देशांमधून परदेशी पर्यटक आले आहेत. कोरोनानंतरच्या काळानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

2021-22 च्या गत चार्टर फ्लाइट सीझनमध्ये 7,630 प्रवासी घेऊन केवळ 42 चार्टर फ्लाईट्स गोव्यात उतरल्या होत्या. तर 2020-21 च्या हंगामात कोविडस्थितीमुळे एकही चार्टर विमान गोव्यात आले नव्हते. प्री-कोविड वर्षांमध्ये (2017-18) गोव्यात 981 चार्टर उड्डाणे आली होती आणि सुमारे 2.5 लाख प्रवासी आले होते.

दरम्यान, या वर्षी जागतिक घडामोडींमुळेही चार्टर फ्लाईट्स येण्यात विलंब झाला. रशिया-युक्रेन युद्ध, ब्रिटनच्या पर्यटकांना ई-व्हिसा देण्यात विलंब, जागतिक अनिश्चितता असतानाही गोव्यात परदेशी पर्यटक तुलनेत मोठ्या संख्येने आले आहेत.

रशिया, कझाकस्तान आणि यूके या देशांतून गोव्यात विदेशी पर्यटक बहुतांश येतात. रशियाचे युद्ध होऊनही रशियन पर्यटकांवर फारसा परिणाम झालेला नाही. व्हिसातील अडचणींमुळे युकेतील पर्यटकांना विलंब झाला. शिवाय बहारीनमधून थेट विमाने येत असल्याने टूर ऑपरेटर आनंदात आहेत.

एकंदरीत गतवर्षीपेक्षा यंदाचा पर्यटन हंगाम चांगला आहे. गोव्याचा परदेशी पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मेपर्यंत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT