Goa University 4 Year Degree: गोवा विद्यापीठा यंदाच्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
तशी परवानगी देण्यात आली आहे. BA, BSc, BCom किंवा इतर कोणत्याही समतुल्य नॉन टेक्निकल पदवींतर्गत अभ्यासक्रमासाठी तीन ऐवजी चार वर्षांचा कालावधी असणार आहे.
गोवा विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने हे बदल करत आहे. 4 वर्षांच्या नॉन-टेक्निकल पदवी अभ्यासक्रमाची सुरवात यंदापासून होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये अशी शिफारस करण्यात आली होती. अशा शिफारसीची अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 पासून BA, BSc, BCom किंवा इतर कोणत्याही समतुल्य सामान्य शिक्षण अभ्यासक्रमात याची सुरवात केली जात आहे.
नुकत्याच झालेल्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत या बदलांना विद्यापीठाने मान्यता दिली. सध्याच्या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाइतके अवघड स्वरूप नवीन चार वर्षांच्या अभ्यासक्रमांचे नसेल.
अशा अभ्यासक्रमांत सहभागी होण्यासाठी तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी लवचिकता असेल. बहुविध पर्यायही उपलब्ध असतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.