स्वच्छतागृहाच्या बोर्डवर सुप्रसिद्ध चर्चचा फोटो; गोव्याच्या Manohar International Airport वरील प्रकाराने संतापाची लाट

विमानतळ प्रशासनाविरोधात नाराजी, गुन्हा दाखल
Manohar International Airport Washroom
Manohar International Airport Washroom Dainik Gomantak
Published on
Updated on

Manohar International Airport Washroom: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धार्मिक भावना दुखावणारा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. या विमानतळावरील स्वच्छतागृहाच्या बोर्डवर चक्क गोव्यातील एका सुप्रसिद्ध चर्चचा फोटो वापरला गेला आहे. त्यातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गोव्यासह देश आणि जगभरातील कॅथलिक समुदायासाठी आणि जे लोक सेंट फ्रान्सिस झेवियरची उपासना करतात त्यांच्यासाठी ही अत्यंत भावना दुखावणारी गोष्ट आहे.

Manohar International Airport Washroom
Sunburn EDM Festival Case: ...तोपर्यंत 1.10 कोटींची सुरक्षा ठेव परत करू नका : गोवा खंडपीठ

विमानतळावरील या बोर्डमध्ये स्वच्छतागृहाच्या दिशेने दाखवलेला बाण दिसतो. आणि त्या खाली ओल्ड गोवा येथील सुप्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बॉम जिझस या चर्चचा फोटो वापरण्यात आला आहे. मोपा येथील हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

देशविदेशातून येथे पर्यटक येत असतात. त्यांच्यासमोर गोव्याचे असे दर्शन होणे हे, धार्मिक भावना दुखावणारे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ओल्ड गोव्यातील हे चर्च एक सक्रीय चर्च असून ते पवित्र मानले जाते. येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र स्मृती जतन केल्या आहेत. त्यामुळे या चर्चबाबत गोव्यातील ख्रिश्चन समुदायाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत.

तथापि, मोपा विमानतळावरील हा प्रकार निर्दशर्नास आल्यानंतर याबाबत येथील पोलिस निरीक्षकांकडे तक्रारदेखील केल्याचे समजते. याबाबत चौकशी केली जावी, आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होती आहे.

Manohar International Airport Washroom
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत दर स्थिर, दक्षिण गोव्यात मात्र वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

इव्हेंट मॅनेजमेंट फर्मने हा फलक उभारल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यासाठी सरकारी अधिकारी, विमानतळ प्रशासनाने परवानगी कशी, दिला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ज्यांनी हा फलक लावला त्यांच्याविरोधात कलम 295A, 504, 505 (2) S. 34 IPC नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com