<div class="paragraphs"><p>Cristiano Ronaldo</p></div>

Cristiano Ronaldo

 

Dainik Gomantak

गोवा

...म्हणून रोनाल्डोच्या पुतळ्याला गोमंतकीयांचा विरोध

दैनिक गोमन्तक

Cristiano Ronaldo: गोव्यात आपल्याला सगळीकडेच फुटबॉलप्रेमी पाहायला मिळतात. गोव्यातील लोक इतर कोणत्याही खेळापेक्षा फुटबॉल (Football) खेळणे आणि पाहणे जास्त पसंत करतात. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात गोव्यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) नवीन पुतळा लावण्यात आला होता. अनेकांसाठी हा पुतळा प्रेरणास्थान ठरेल असे म्हंटले जात होते, पण त्यातच आता भारताच्या खेळाडूऐवजी पोर्तुगीज फुटबॉलपटूचा (Portugal Footballer) गौरव करण्यात आल्याने काही रहिवाशांनी यावर आक्षेप घेतला आहे.

पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळ्याने गोव्यात आता राज्यात खळबळ उडवून दिली आहे. ज्या देशाच्या लोकानी आपल्या गोव्यावर राज्य केले त्या देशाच्या खेळाडूचा पुतळा गोव्यात उभारून त्याचा सन्मान केल्याबद्दल इथल्या नागरिकांनी नाराजी दर्शविली आहे. कळंगुटमध्ये पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याप्रती निषेध व्यक्त करण्यासाठी इथल्या स्थानिकांनी काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्याचे ठरवले.

याच प्रकरणासंदर्भात गोव्यातील माजी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मिकी फर्नांडिस म्हणाले की, 'ही निवड दुख:दायक होती. रोनाल्डो हा जगातील सर्वोत्तम खेळाडू, फुटबॉलपटू आहे, पण इथे आमच्याकडे गोव्यातील फुटबॉलपटूचा पुतळा उभारणे अपेक्षित होते.

यावर मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) म्हणाले की, ' गोव्यात हा पुतळा उभारण्यामागे तरुणांना केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करणे हाच उद्देश आहे. ज्या मुला-मुलींना फुटबॉलमध्ये आपले करियर बनवायचे आहे, त्यांना ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या प्रसिद्ध खेळाडूकडून प्रेरणा मिळेल. जर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील आणि त्यासाठी आणि टी तुमची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच तुमचे अपेक्षित ध्येय गाठू शकता, आणि आम्ही पुतळ्याजवळच्या फलकावरदेखील हेच लिहिले आहे.'

पोर्तुगीजांनी (Portuguese) गोवा सोडल्यानंतर अजूनही गोव्यात त्यांचा प्रभाव पाहायला मिळतो. इथली वास्तूशैली, संस्कृतीतील काही गोष्टी, इथल्या काही लोकांची आडनावे सुद्धा पोर्तुगीजांच्या गोव्यातील अस्तित्वाची साक्ष देतात. गोव्यातील लोक फुटबॉल मध्ये बऱ्याचदा पोर्तुगालच्या संघाला फॉलो करताना दिसतात. फर्नांडिस म्हणाले की, 'मी सुद्धा पोर्तुगालला फॉलो करतो, पण जेव्हा आपल्याकडे आपले स्वतःचे खेळाडू असताना आपण बाहेरच्या कोणाचा पुतळा इथे लावू शकत नाही.' आता या प्रकरणात पुढे नेमके काय घडणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT