Traffic jam Panjim Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City : ‘स्मार्ट' पणजीची रोजच ‘कोंडी’ ! सुटका कधी ?

धूळ, उन्हाच्या चटक्यांमुळे त्रस्त वाहनचालकांचा सवाल

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Smart City : राजधानी पणजीतील सांतिनेज भागात आज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. मधुबन कॉलनीच्या सर्कलपासून ते सांतिनेजमधील विवांता हॉटेलच्या सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली.

बांदोडकर मार्गावर मिरामारपासून डांबरीकरणाला सुरुवात झाली असल्याने अनेक वाहन सांतिनेजमधील रस्त्यावरून येणे पसंत केले, त्यातच या भागात ‘साबांखा’तर्फे मलनिस्सारणाच्या भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाल्याचे दिसून आले.

सकाळी दहानंतर सुमारे एक तास आणि दुपारी 12.30 नंतर एक ते सव्वा तास वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. मिरामारहून पणजीत येणारी अनेक वाहने बालभवन येथून सांतिनेजमार्गे येऊ लागल्याने या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

रस्ता खोदकामामुळे अगोदरच रस्ता अरुंद होत आहे, त्यातच अनेक ठिकणी वाहने उभी करून ठेवली असल्याने त्यात दोन्ही बाजूने वाहने येणे-जाणे मुश्‍कील होऊन बसले होते. पोलिसांच्या वाहतूक विभागाचा एकही पोलिस याठिकाणी नजरेस पडला नाही.

विशेष म्हणजे ही कोंडी मानवनिर्मित असल्याने अखेर वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागला आणि त्यांनाच त्यातून वाट काढावी लागली. शाळा सुटण्याची आणि दुपारी जेवायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकाचवेळी सांतिनेज परिसरात वाहने आल्याने ही कोंडी आणखी वाढली. महत्त्वाची बाब म्हणजे चार चाकी वाहन धारक अधिक संख्येने होते.

दुचाकी चालक जागा मिळेल, तेथून वाट काढीत पुढे जात होते. मात्र कारचालकांना पुढील वाहन सरकल्यानंतरच पुढे जावे लागत होते. उन्हामुळे अनेकांना कधी एकदाचा कोंडीतून बाहेर पडतो, असे वाटत होते.

वाहतूक पोलिस असतात कुठे?

मार्च महिना सुरू झाला आहे. पोलिस खात्यासाठीही हा महिना महत्त्वाचा मानला जातो. त्यात वाहतूक पोलिसांनाही वार्षिक कारवाईचा अहवाल द्यावा लागतो, त्यामुळे कदाचित वाहतूक पोलिसांना अशा कोंडीत येण्यापेक्षा तालांव देण्यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणांवर जाणे पसंत पडलेले असावे, असे दिसते.

वाहतूक कोंडी असताना वाहतूक पोलिसांची एकही शिट्टी कानावर पडत नाही, हे विशेष. त्यावरून वाहतूक कोंडीचे पोलिसांना काहीच पडलेले नाही, असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT