Konkani Language Dainik Gomantak
गोवा

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

Pramod Sawant On Konkan: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबाबत अभिमान बाळगून तिच्या संवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबाबत अभिमान बाळगून तिच्या संवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु आज जवळपास ६० टक्के घरांतून कोकणी गायब झाली आहे, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे व्यक्त केली.

डिचोलीचे सुपुत्र आणि कोकणीचे महापुरुष शणै गोंयबाब यांच्या १४९व्या जयंती उत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गोवा कोंकणी अकादमीच्या सहकार्याने डिचोली कोंकणी सेवा केंद्रातर्फे मंगळवारी (ता. २३) शणै गोंयबाब यांची १४९वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहातील स्व. सदानंद कारापूरकर व्यासपीठावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खास निमंत्रित म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तर अध्यक्षस्थानी गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये स्वागताध्यक्ष रुपेश ठाणेकर, डिचोली कोंकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सावंत, उद्योजक वल्लभ साळकर, शणै गोंयबाब यांचे नातू सदाशिव वर्दे वालावल्लीकर, कोंकणी अकादमीचे सचिव पराग नगर्सेकर आदींचा समावेश होता.

डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी आपल्या भाषणातून कोंकणी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन केले.

रुपेश ठाणेकर यांनी स्वागत केले. शलाका देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर पराग नगर्सेकर यांनी आभार मानले.

कोंकणीसाठी गेल्या ६० वर्षांत जे शक्य झाले नाही, ते आपण मुख्यमंत्रीपदाच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ठामपणे सांगितले.

कोकणीच्या संवर्धनासाठी आजच्या युवा पिढीने प्रामाणिकपणे कोकणी साहित्यनिर्मिती करावी, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत

शणै गोंयबाब यांना कोंकणी भाषेविषयी स्वाभिमान होता. त्यामुळेच त्यांनी अपमान सहन करत कोंकणीसाठी कार्य केले. आजच्या युवा पिढीने त्यांचे विस्मरण करता कामा नये, असे डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले.शणै गोंयबाब यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक व्हावे, ही डिचोलीवासीयांसह कोंकणीप्रेमींची इच्छा आहे.

त्यामुळे त्यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वी डिचोलीत स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. शेट्ये यांनी दिली. तसेच, या कार्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली. आगामी निवडणुकीत भाजप सरकार सत्तेवर यावे आणि डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असेही डॉ. शेट्ये म्हणाले.

मान्यवरांचा सन्मान; विद्यार्थ्यांचा गौरव

कोंकणीच्या विकासासाठी मौलिक कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा यावेळी आयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला. कोंकणीसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुपारच्या सत्रात ‘नव्या युगातील कोंकणी सेवा संस्था : भविष्यातील आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद आणि ‘गोव्याची कला आणि साहित्य’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळच्या सत्रात दहावी व बारावीच्या परीक्षेत कोंकणी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या तालुक्यातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT