Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Illegal Hill Cutting in Karapur Sarvan: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलिंग मिल परिसरात लोकवस्तीच्या जवळच बेकायदेशीरपणे डोंगरकापणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Illegal Hill Cutting in Karapur Sarvan
Illegal Hill CuttingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलिंग मिल परिसरात लोकवस्तीच्या जवळच बेकायदेशीरपणे डोंगरकापणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या डोंगरकापणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.

मामलेदार कार्यालयातील तलाठ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित व्यक्तीला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंतही पोहोचली असून, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे समजते. कारापूर-सर्वण पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवर बांधकाम करण्यासाठी यादव नामक व्यक्तीने आवश्यक परवाना घेतला आहे.

Illegal Hill Cutting in Karapur Sarvan
Goa Government Employees: 18 वर्षे वेतन आयोग बदललाच नाही! सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचाऱ्यांचा डिसेंबरपासून एल्गार

मात्र, डोंगरकापणीसाठी नगरनियोजन खात्याची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे समजते. त्यामुळे या कामाच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीही याच प्रभागात बेकायदा डोंगरकापणीचा प्रकार घडला होता. वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय भूमिका घेते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंचायतीला प्रतीक्षा लेखी तक्रारीची

कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंच तथा प्रभाग ११ च्या पंचसदस्य बीबी आयेशा मागोड यांनी हा प्रकार पंचायतीच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाचीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, असे सरपंच योगेश पेडणेकर यांनी स्पष्ट केले. लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचायत पुढील कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पंचायत नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Illegal Hill Cutting in Karapur Sarvan
Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

कागदपत्रे सादर करण्याची सूचना

डोंगरकापणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित व्यक्तीला डोंगरकापणीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंतही पोहोचली आहे. मात्र, कोणती कारवाई झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.