Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Andre Russell T20 World Record: टी20 क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडीजचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने अशा एका महाविक्रमाला गवसणी घातली, ज्याची जगभरात चर्चा होत आहे.
Andre Russell T20 World Record
Andre Russell T20 World RecordDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Andre Russell T20 World Record: टी20 क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने अशा एका महाविक्रमाला गवसणी घातली, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. सध्या सुरु असलेल्या नेपाळ प्रीमियर लीग 2026 मध्ये 'विराटनगर किंग्स' संघाकडून खेळणाऱ्या रसेलने आपल्या तुफानी कामगिरीच्या जोरावर टी20 क्रिकेट विश्वात एक ऐतिहासिक टप्पा पार केला.

टी20 क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात 10 हजार धावांचा पल्ला ओलांडण्यासोबतच 500 हून अधिक विकेट्स नावावर करणारा तो जगातील पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वीच आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 500 विकेट घेण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या रसेलने आता फलंदाजीमध्येही 10 हजार धावा पूर्ण करत हा अनोखा डबल रेकॉर्ड केला.

Andre Russell T20 World Record
IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

आंद्रे रसेलच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, टी20 क्रिकेटमध्ये 10 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत आता त्याचे नाव 21व्या स्थानी आहे. या विक्रमी यादीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉश बटलर 15 हजारांहून अधिक धावांसह अव्वल स्थानी विराजमान आहे, तर वेस्ट इंडिजकडून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे, ज्याने 14,999 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, टी20 क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात 500 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या मोजक्या 6 गोलंदाजांमध्ये रसेलचा आधीच समावेश होता आणि लवकरच त्याचे 550 बळी पूर्ण होणार आहेत.

Andre Russell T20 World Record
Rohit Sharma T20 Comeback: '2027 च्या वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक!' रोहित शर्माच्या विधानाने चर्चेला उधाण, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? Watch Video

रसेलने आपल्या आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नेहमीच अष्टपैलू खेळाचे अप्रतिम दर्शन घडवले. वेस्ट इंडिजसाठी 56 वनडे सामन्यात 1034 धावा आणि 70 विकेट्स घेण्यासोबतच, 85 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1122 धावा आणि 61 बळी त्याच्या नावावर आहेत. याशिवाय, जगातील सर्वात लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 139 सामन्यात 2651 धावा आणि 123 बळी टिपले आहेत. आपल्या करिअरचा बहुतांश काळ टी20 लीग्ससाठी समर्पित करणाऱ्या 650 हून अधिक टी20 सामने खेळलेल्या रसेलने या विक्रमासह सिद्ध केले की, आधुनिक क्रिकेटमधील तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.