Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Diwali Inflation Report: घरात बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक मिठाईपासून ते बाजारातील महागडे सुका मेवा (ड्रायफ्रूट्स) आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर कमालीचे वाढले.
Diwali Inflation Report 2026
Diwali Inflation Report 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Diwali Inflation Report 2026: यंदाच्या दिवाळीत वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा दणका दिला. घरात बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक मिठाईपासून ते बाजारातील महागडे ड्रायफ्रूट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर कमालीचे वाढले. दूध, तूप, लोणी आणि ड्रायफ्रूट्सच्या किमती गगनाला भिडल्याने यंदाच्या दिवाळीचे फॅमिली बजेट पूर्णपणे कोलमडले.

सणांच्या काळात दुग्धजन्य पदार्थांची मागणी सर्वाधिक असल्याने अमूलने 1 किलो तुपाचे दर 630 रुपयांवरुन 680 रुपये केले तर कर्नाटकाच्या नंदिनी डेअरीने 1 लिटर तुपाची किंमत थेट 850 रुपयांपर्यंत वाढवली. आविन डेअरीनेही तुपाचे दर वाढवले. याशिवाय, दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी आणि मिठाईत वापरल्या जाणाऱ्या सुक्या मेव्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले. गेल्या एका वर्षात पिस्त्याच्या किमतीत 60 ते 70 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असून पेशावरी पिस्ता थेट 4000 रुपये प्रति किलोच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. तसेच, बदामाच्या दरात 20 ते 40 टक्के आणि साखरेच्या (Sugar) किमतीत 29.8 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे मिठाई बनवणे खूप महाग झाले.

Diwali Inflation Report 2026
Inflation Hike 2026: साबण, चॉकलेटपासून मोबाईल रिचार्जपर्यंत... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; कच्चा माल महागल्याने महागाईचा उडणार भडका

सप्टेंबर 2026 मध्ये खाद्यपदार्थांची किरकोळ महागाई 7.74 टक्क्यांवर पोहोचली असून ती रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे. केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच नव्हे तर घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही महाग झाली आहेत. गेल्या एका वर्षात एसी, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिनच्या किमतीत तब्बल 23 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सणासुदीचा काळ सुरु होण्यापूर्वीच कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर 3 ते 8 टक्क्यांची ताजी भाववाढ केल्याने सर्वसामान्यांचे सणांचे आर्थिक गणित पुरते बिघडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.