NCRB Data Of Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मानवी तस्करीप्रकरणी सहा पीडितांची सुटका

Goa Crime News: रायबंदरमधील घटना: महिलेसह दांपत्यास अटक

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मानवी तस्करी प्रकरणात गुंतलेल्या एका दांपत्यासह एका महिला दलालास अटक करण्यात आली आहे, तसेच सहा पीडित महिलांची सुटका केली आहे, अशी माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांनी दिली.

रायबंदर येथील एम. के. पब हाउस येथे लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार 18 डिसेंबर रोजी सोस्तिका पून (वय 18, नेपाळ) या युवतीने दाखल केली होती. त्यानंतर जुने गोवे पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणातील मुख्य संशयित बारमालक महेश हेगडे (38, उडुपी – कर्नाटक) याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 2.17 वाजता अटक केली, तर होबळे रिव्हर लॉज, रायबंदर येथे रहात असलेल्या कश्मीरा महेश हेगडे ऊर्फ रिधम लामा (24, बंगळूर – कर्नाटक) आणि दीपा ठाकुरी (24, नेपाळ) या दोन्ही महिला संशयितांना मध्यरात्री 12.04 वाजता अटक करण्यात आली.

संशयित कोठडीत

मानवी तस्करी करून महिलांना वेश्या व्यवसायात गुंतवल्याप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही संशयितांना पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश सावंत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT