Goa Government Job: स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना 26 जानेवारीपूर्वी नोकऱ्या

Goa Government Job: मुख्यमंत्री: कुळांना जमिनीचे हक्क लवकरच
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government Job: स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न येत्या 26 जानेवारीपूर्वी पूर्णतः मार्गी लागेल. यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या 28 हून अधिक मुलांना राज्य सरकारने नोकऱ्या दिल्या आहेत. उर्वरित मुलांना 26 जानेवारीपूर्वी नोकऱ्या देण्यात येतील.

Goa Government Job
Goa Liberation Day: बोरी पूल स्‍फोटकांनी उडवला; मडगावलाही जाणवला हादरा

कुळांना जमिनीचे हक्क प्रदान करण्यासाठी पावले उचलली असून तोही प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच 2050 सालापर्यंत गोवा राज्य कार्बन उत्सर्जन विरहित करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

गोवा विद्यापीठाच्या मैदानावर 63 व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात पोलिस पथक, शाळांच्या पथकांनी संचलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या औपचारिक भाषणानंतर त्यांच्या हस्ते सात पोलिस अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री सुवर्णपदक’ बहाल करून गौरविण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

Goa Government Job
Sunburn Goa 2023: 28 अटींच्‍या पूर्ततेची सक्‍ती; उल्‍लंघन झाल्‍यास फेस्‍टिवल बंद

2050 पूर्वी गोवा राज्य कार्बन उत्सर्जन विरहित करण्याचे सरकारचे लक्ष्य असून ते पूर्ण करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. राज्य आणि केंद्र सरकारने नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या समाजातील चार घटकांना सक्षम करण्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

झुआरीची दुसरी लेन 22ला खुली : येत्या 22 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्‍घाटन करण्यात येणार असून त्यादिवशी ती लेन लोकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच दिवशी 270 कोटींचा रिव्हॉलविंग रेस्टॉरंट प्रकल्प आणि पर्वरी येथील 641 कोटीच्या उड्डाणपूल प्रकल्पाची पायाभरणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकारणार : पत्रादेवी येथील स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक, हिरवे गुरुजींचे स्मारकही लवकरच तयार होणार असल्याचे सांगून स्वातंत्र्यसैनिकांना समृद्ध गोवा पाहण्याचे स्वप्न होते. अंतोदय, ग्रामोदय आणि सर्वोदय तत्त्वे आत्मसात करून हे सरकार सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com