Anjuna Beach Dainik Gomantak
गोवा

बीचवरील कर्कश्श आवाजाचा त्रास, शिवोलीत विद्यार्थ्यांची तक्रार

स्थानिक पंचायतीसह पोलिसांकडेही मागितली दाद, आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

शिवोली : गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच किनाऱ्यावरील हॉटेल्सना देश-विदेशातील पर्यटकांची पसंती मिळताना दिसत आहे. असं असलं तरीही पर्यटकांच्या गोंगाटाचा आता सर्वसामान्य गोवेकरांना त्रास होऊ लागला आहे. बीचवरील कर्कश्श संगितामुळे आसपासच्या परिसरात राहणारे रुग्ण, विद्यार्थी यांना सर्रासपणे त्रास होताना दिसतो आहे. (Goa Tourism News Updates)

आता शिवोलीतील एका शाळेने या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवला आहे. शिवोलीतील वसंत विद्यालयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सातत्याने वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या पार्ट्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनाऱ्याशेजारील हॉटेल्स (Hotel) आणि रेस्टॉरंट्सकडून मोठ्या आवाजात संगीत चालवलं जातं. त्यावर पर्यटकांची पावलंही थिरकताना दिसतात. मात्र आता याचा त्रास गोव्यातील नागरिकांनाच होऊ लागल्याने विरोध सुरु झाला आहे.

शिवोलीतील विद्यार्थ्यांनी (Student) आता थेट राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्क लिहून हॉटेल मालकांविरोधात तक्रार केली आहे. लहानमोठ्या हॉटेल्समध्येही सर्रासपणे मोठ्या आवाजात संगीत चालवलं जातं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. याआधी विद्यार्थ्यांनी स्थानिक पंचायत, हणजूण पोलीस (Police) आणि किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणालाही पत्र लिहिलं होतं. मात्र आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासनाने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

SCROLL FOR NEXT