करमणे येथे मृतदेह सापडल्याने खळबळ

कोलवा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद
Dead Body found in Karmona
Dead Body found in KarmonaDainik Gomantak

मडगाव : करमणे येथे एक व्यक्ती मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या कनर्ल सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Dead Body found in Karmona News Updates)

Dead Body found in Karmona
मांडवी नदीत सापडला कामगाराचा मृतदेह

करमणे येथे मृत व्यक्ती सापडल्याची पोलिसांना (Police) माहिती मिळताच तातडीने पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. मृत व्यक्तीला दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले आहे. मालीम-बेती जेटीवर शुक्रवारी रात्री मारहाण करून नदीत फेकून दिलेल्‍या शिब्रण राम (20, मूळ छत्तीसगड) या मच्छीमारी बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह रविवारी सकाळी मांडवी (Mandovi) नदीत तरंगताना सापडला होता. आता आणखी एक मृतदेह सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Dead Body found in Karmona
पेडणे येथील घराला आग; 3 लाखांचे नुकसान

दरम्यान या मृत व्यक्तीची ओळख पटली असली, तरी त्याचा गाव आणि इतर माहिती मिळू शकली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असण्याची शक्यता आहे. या इसमाचा मृतदेह पुढील तपासासाठी मडगावच्या (Madgaon) शवगृहात ठेवण्यात आला आहे. याविषयी कोलवा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com