Siolim Bridge Car Stunts Dainik Gomantak
गोवा

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

Goa Siolim Bridge Car Stunts: गोव्याच्या सौंदर्याचा आनंद लुटायला येणाऱ्या काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे इतरांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Sameer Amunekar

गोव्याच्या सौंदर्याचा आनंद लुटायला येणाऱ्या काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे इतरांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवोली पुलावर (Siolim Bridge) अत्यंत बेजबाबदारपणे गाडी चालवून जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका पर्यटकाला हणजूण पोलिसांनी दणका दिला आहे. या पर्यटकाने स्वतःच्या मनोरंजनासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून पुलावर धोकादायक कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

जीवघेणी स्टंटबाजी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पर्यटकाने भाड्याने घेतलेली टॅक्सी (Rented Cab) पुलावर वेगाने चालवत स्टंटबाजी केली. या पुलावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते, अशा वेळी अशा कृत्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता होती.

पर्यटकाच्या या कृत्यामुळे पुलावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जीव धोक्यात घालणाऱ्यांविरुद्ध स्थानिकांनीही संताप व्यक्त केला होता.

मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई

हणजूण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित भाड्याची कार जप्त केली. या पर्यटकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या (MV Act) कलम १८४ एफ (Section 184F) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे कलम अत्यंत धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याशी संबंधित आहे. पर्यटकाची कसून चौकशी करण्यात आली असून, पोलिसांनी जप्त केलेली कार आता तपासाचा भाग आहे.

केवळ दंड आकारून पोलिसांनी हे प्रकरण सोडलेले नाही. अंजुना पोलिसांनी या घटनेचा सविस्तर अहवाल म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे (JMFC Mapusa) पाठवला आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार या पर्यटकावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: युद्धाच्या सावटात ट्रम्प यांचं 'थँक्यू' मिशन! 800 कैद्यांची फाशी रोखल्यानं अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल; इराणवरील हल्ल्याच्या चर्चेला फाटा

Sindhudurg Crime: पालकांचा 'तो' निर्णय अन् राष्ट्रीय कबड्डीपट्टूनं संपवली जीवनयात्रा, सावंतवाडीत 10वीच्या विद्यार्थ्यान उचललं टोकाचं पाऊल

Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

खुशी मुखर्जीला 'सूर्या'शी पंगा घेणं पडलं महागात! 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल; आता म्हणते, "माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला"

Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT