Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: कर्नाटकात म्हादईसंदर्भातील मौन भाजपच्या दुटप्पी वृत्तीचा पुरावा- सरदेसाई

भाजप नेत्यांकडून म्हादईच्या शवपेटीला खिळा

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute कळसा-भांडुरा येथील वादग्रस्त सिंचन प्रकल्प कुठल्याही स्थितीत पूर्ण करणारच अशी भूमिका कर्नाटक भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केल्यानंतरही सध्या कर्नाटक निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेल्या गोव्यातील एकही भाजप नेत्याने त्यावर एक शब्दही उच्चारलेला नाही.

या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘या मौनातून गोव्यातील भाजप नेत्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत आहे’ अशी टीका केली आहे.

10 मेच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या आश्वासनानंतर, गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे केलेल्या ट्विटमध्ये भगव्या पक्षाच्या या ‘लबाडीच्या ताबूत’ या स्वार्थी भाजप नेत्यांनी ठोकलेला शेवटचा खिळा असे म्हटले आहे.

“गोव्यातील भाजपच्या खोटारड्या नेत्यांनी म्हादईच्या शवपेटीत आणखी एक खिळा ठोकला असून भाजप कर्नाटकचा निवडणूक जाहीरनामा हा गोवा भाजप नेत्यांच्या माय म्हादई विकण्यात सक्रिय सहभागाचा आणखी एक पुरावा आहे, असे सरदेसाई यांनी ट्विट केले आहे.

कर्नाटकात प्रचारासाठी गावोगावी फिरत असताना, त्यांना म्हादईवर बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीत, परंतु गोव्याचे मुख्यमंत्री म्हादईचा गळा घोटू पाहणारे बसवराज बोम्मई यांच्यासाठी मते मागण्यासाठी त्यांच्या आवाजात आवाज मिसळून जोरात ओरडू शकतात, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

विरोधकांचा भाजप नेत्यांवर निशाणा

गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील भाजप नेते आणि मंत्री आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकातील अनेक विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते जाहीर सभांमध्ये कन्नडमध्ये बोलतानाही दिसतात.

म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मदत केल्याबद्दल गोव्यातील विरोधकांनी या नेत्यांवर निशाणा साधला होता. विजय सरदेसाई यांनी त्यांना पुन्हा एकदा खिंडीत गाठले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Grah Gochar 2026: नशिबाचे बंद दरवाजे उघडणार! अरुण ग्रहाचे गोचर ठरणार 'या' लोकांसाठी गेमचेंजर; नव्या उमेदीने होणार आयुष्याची सुरुवात

खरी कुजबुज: गोवा विरुद्ध गोवा

OBC Reservation Goa Medical PG: ओबीसींना नवे 'वैद्यकीय दालन'! पदव्युत्तर क्लिनिकल शाखांतही आरक्षण; गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

Mandovi River New Casino: मांडवीत नवीन कॅसिनोसाठी 'नो एन्ट्री'! 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती; परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी कोर्टाची पूर्वपरवानगी अनिवार्य

SCROLL FOR NEXT