Goa Crime: ‘फ्राईड राईस’ ऑर्डरच्या वादातून ग्राहकाला मारहाण, नागवे येथील घटना

नागवे ग्रामस्थांचा पोलिस स्थानकावर धडक मोर्चा
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime नागवे येथील एका रेस्टॉरंटमध्ये ‘फ्राईड राईस’ची ऑर्डर दिल्यानंतर ग्राहक अमोल खांडेपारकर यांनी हॉटेलमालकाला पैसे किती झाले, असे विचारले.

कामगाराने सांगितलेला दर आणि मालकाने सांगितलेला दर यात फरक असल्याने अमोल यांनी विचारणा केली असता मालक आणि त्यांच्यात वाद झाला.

या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मालक प्रदीप पार्सेकर याने ग्राहक अमोल यांच्यावर कामगारांसह हल्ला चढविल्याने अमोल बेशुद्ध झाले.

त्यानंतर नागवे ग्रामस्थांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेत ते रेस्टॉरंट बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सोमवारी रात्री अमोल खांडेपारकर हे या रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस घेण्यासाठी गेले. ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी त्याचे किती पैसे झाले, असे विचारले. त्यावेळी एका कामगाराने त्यांना 120 रुपये झाल्याचे सांगितले.

मात्र, ऑर्डर घेताना बारमालक दीपक पार्सेकर याने 150 रुपये बिल झाल्याचे सांगितले. बिलात अशी तफावत का, असे विचारल्यानंतर पार्सेकर याने अमोल यांच्यावर दांड्याने हल्ला केला. वेटर बिरो काळे आणि कुक राजेश सावंत या दोघांनीही त्यांना मारहाण केली.

Crime
Sanquelim Municipal Elections 2023: साखळी निवडणूकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात; तुल्‍यबळ लढतीची शक्‍यता

स्थानिक आक्रमक

नागवेतील या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. वाळपई पोलिस स्थानकात ग्रामस्थांनी त्या तिघांना अटक करण्याची मागणी केली. संतप्त गावकऱ्यांनी ठाण्यात गर्दी करत पोलिसांना धारेवर धरले.

त्यानंतर बारचालक प्रदीप पार्सेकर, बिरो काळे, राजेश सावंत तिघांवरही गुन्हा नोंद करून अटक केली. खांडेपारकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com