Shriram Digvijay Yatra Dainik Gomantak
गोवा

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

Goa Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे गोकर्ण-पर्तगाळीला आज सायंकाळी ६.३० वा. आगमन झाले. मठानुयायी व अन्य भाविकांनी रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: श्रीराम दिग्विजय यात्रेचे गोकर्ण-पर्तगाळीला आज सायंकाळी ६.३० वा. आगमन झाले. मठानुयायी व अन्य भाविकांनी रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले. बद्रीनाथ येथून सुरू झालेल्या रथाची परिक्रमा ३९ दिवसांत १२० जप केंद्रांना भेट देऊन आज मठात आली. सुमारे ८,२०० किलोमीटरचा प्रवास करून श्रीराम दिग्विजय यात्रा मठात पोहोचली. यावेळी आतिषबाजीने रथाचे स्वागत करण्यात आले.

होन्नावर येथील संतोष पै यांनी बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत ८ हजार किलोमीटर रथाचे सारथ्य केले आहे. कधी कडाक्याची थंडी ऊन-पाऊस यांचा मारा झेलत त्याचप्रमाणे डोंगराळ रस्ता यांचा सामना करत हा प्रवास केला आहे. त्यासाठी माझ्या मागे श्री रामाचे बळ आहे. त्यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे संतोष पै यांनी सांगितले. पर्तगाळी गोकर्ण जिवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बद्रीनाथ येथून १८ ऑक्टोबरला काढलेल्या श्रीराम दिग्विजय यात्रेचे आज मठात आगमन झाले.

श्री राम दिग्विजय रथाची परिक्रमा २२ नोव्हेंबरला सकाळी मुडगेरी-कारवार येथून सुरू होऊन गोव्यात तिचे आगमन झाले होते. त्यानंतर गोव्यातील वेगवेगळ्या केंद्रांना भेटी देऊन आज २६ नोव्हेंबरला काणकोण येथील मोखर्ड व सायंकाळी पर्तगाळी येथे रथाचे आगमन झाले.

२३ नोव्हेंबरला वास्को, त्याचदिवशी पर्वरी येथे रथाचे आगमन होऊन त्याच ठिकाणी त्याचा मुक्काम होता. २४ नोव्हेंबरला सकाळी पर्वरी येथून डिचोली, साखळी, माशेल, म्हार्दोळ, मंगेशी, सायं. ६ वा. गोठण येथे त्यांचे आगमन झाले. २५ नोव्हेंबरला सकाळी त्या ठिकाणाहून रथाचे प्रस्थान होऊन त्यानंतर बांदीवडे, रामनाथी, शिरोडा, रिवण व मडगाव येथे आगमन होऊन त्याच ठिकाणी मुक्काम झाला.

२६ नोव्हेंबरला मडगावहून प्रस्थान करून कुंकळ्ळी येथील सावरकट्टा त्यानंतर काणकोण येथील मोखर्ड व सायंकाळी पर्तगाळी येथे रथाचे आगमन झाले. या सर्वच उपकेंद्रांत मठानुयायी व अन्य भक्तांनी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

पर्तगाळ मठ कार्यक्रमासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५०व्या वर्षाच्या समारंभासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्‍ना क्लीटस यांनी दिली आहे.

पर्तगाळ मठाच्या उत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार २८ रोजी भेट देणार असून यावेळी आशिया खंडातील सर्वांत भव्य अशा श्रीराम मूर्तीचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही प्रस्तावित भेट लक्षात घेऊन रिअल टाइम देखरेख, घटना प्रतिसाद आणि सार्वजनिक मदतीसाठी समर्पित नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक : ११२. तालुका नियंत्रण कक्ष, काणकोण आणि (उपजिल्हाधिकारी उपन्यायदंडाधिकारी कार्यालय) ९२७२०५७८६३. जिल्हा नियंत्रण कक्ष, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय : ०८३२-२७९४१०० पोलिस नियंत्रण कक्ष, काणकोण पोलिस स्टेशन : ०८३२-२६३३३५७ कार्यक्रमादरम्यान कोणत्याही मदतीसाठी नागरिक वरील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात, असे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

२७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत हा वर्धापनदिन सोहळा चालणार आहे.

२७ नोव्हेंबरला सायं. ७.३० वा. अनुप जलोटा यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

२८ नोव्हेंबरला रात्री ८.३० वा. मुंबई येथील कलाकारांचा रामलीला रूप नृत्य नाट्याचा कार्यक्रम.

२९ नोव्हेंबरला सायं. ६ वा. बंगळुरू येथील भालचंद्र प्रभू व रघुनंदन भट यांचा ‘भाव पुष्पांजली’ कार्यक्रम.

३० नोव्हेंबरला सायं. ६ वा. शंकर महादेवन यांचा ‘स्वर संध्या’ कार्यक्रम.

२ डिसेंबरला सायं. ७.३० वा. गोव्यातील कलाकारांचा ‘नांदी दर्शन’ कार्यक्रम.

३ डिसेंबरला सायं. ७.३० वा. ७७ कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम.

४ डिसेंबरला रात्री ९ वा. विश्वजीत बोरवानकर व शरयू दाते यांचा ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कार्यक्रम.

५ डिसेंबरला रात्री ९ वा. मुंबई येथील निलांद्रीकुमार यांचा सितार व सत्यजीत यांचा तबला वादनाचा ‘नंद लहरी’ कार्यक्रम.

६ डिसेंबरला रात्री ९ वा. दिल्ली येथील मैथिली ठाकूर यांचा ‘भजन संध्या’ कार्यक्रम.

७ डिसेंबरला रात्री ९ वा. महेश काळे यांचा ‘स्वर संध्या’ कार्यक्रम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Goa Live News: पूजा नाईक 'नोकरीसाठी पैसे' प्रकरण: चौकशी अजूनही सुरू; आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत: पोलीस महासंचालक

SCROLL FOR NEXT