Goa Politics: 'आघाडी नको, निवडणूक आम्ही स्वबळावर लढू', काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका; विरोधकांच्या आघाडीचा गुंता अजूनही सुटेना

Goa Politics Update: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची एक आघाडी असेल की दोन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची एक आघाडी असेल की दोन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यातील गुंतागुंत वाढत असतानाच कॉंग्रेसचे कार्यकर्ते कॉंग्रेस हाऊसमध्ये थडकून ‘आघाडी नको, आम्ही स्वबळावर लढू’ अशी भाषा बोलू लागले आहेत.

सांत आंद्रे, शिवोली, सांताक्रुझ आणि थिवीतील कॉंग्रेस गट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि खासदार विरियातो फर्नांडिस यांची भेट घेऊन ‘आरजी’सोबत आघाडी नकोच, अशी भूमिका घेतली आहे. हे कार्यकर्ते भेटण्यासाठी पणजीत आले, तेव्हा मोठा आवाज ऐकू येत होता.

कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डची विधानसभा निवडणुकीपासून आघाडी आहे. त्यात रिव्हॉल्युशनरी गोवन्स असेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळता मिळत नाही, अशी स्थिती आहे.

Goa Politics
Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

‘मी दिल्लीला जात आहे. लवकरच काहीतरी महत्त्वाचे घडणार आहे.’ असे ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी सांगून राजकीय वर्तुळातील सर्वांना कान टवकारायला लावले आहेत. सध्याच्या टप्प्यावर मी यावर काहीही बोलू इच्छित नाही.

गोव्यातील लोकांच्या हिताचे आणि भाजपचा पराभव करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक असेल ते आम्ही करणार आहोत. राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणत त्यांनी ‘आरजी’सोबतही आघाडी होऊ शकते, याचे संकेत दिले आहेत.उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षांनी रणनीती सुरू केली आहे.

Goa Politics
Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

अमित पालेकरांच्या दिल्लीवारीचे गूढ

मध्यंतरी त्या पक्षाचे नेते मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्या दिल्लीवारीने उत्सुकता वाढवली होती. त्यांनी आघाडीसाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत दिल्यानंतर बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर दिल्लीला रवाना झाल्याने वेगळे राजकीय चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

...तर मतविभागणी अटळ

भाजपविरोधात ‘आप’ व ‘आरजी’ची एक आघाडी तर कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डची दुसरी आघाडी, असे झाल्यास मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ शकतो. भाजपविरोधी मतांची फाटाफूट होऊ नये, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, आता फूट अटळ दिसत आहे. अद्यापही कॉंग्रेस आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com