Shripad Naik Gomantak Digital Team
गोवा

Shripad Naik : देशात समान नागरी कायदा लवकरच लागू होणार ; वाढती लोकसंख्या चिंताजनक

हा कायदा चालू वर्षांत किंवा पुढच्या निवडणुकीनंतर चालीस लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

देशातील वाढती लोकसंख्या ही चिंतेची बाब. अशावेळी यावर नियंत्रणासाठी समान नागरी कायदा गरजेचा आहे. हा कायदा चालू वर्षांत किंवा पुढच्या निवडणुकीनंतर चालीस लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. जेणेकरून मूलभूत विकासाचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य घेऊ शकतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

सोमवारी, म्हापशात भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार जयेश नाईक, महानंद अस्नोडकर, आशिष शिरोडकर, राजसिंग राणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. जीडीपीबाबत श्रीपाद नाईक म्हणाले, विकासकामे करताना जीडीपी थोडीशी कमी-जास्त होते.

मात्र अधिक जीडीपीचा तसा त्रास झालेला दिसत नाही. केंद्र सरकारकडून जवळपास 80 कोटी लोकांना मोफत धान्यांचे वितरण केल्याचे ते म्हणाले. तर कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीवर भाऊ म्हणाले की, कर्नाटक निकाल भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. लोकसभेवर त्याचा परिणाम होणार नाही.

घरोघरी प्रचार

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे भाजपाने विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेतलेत. त्याअंतर्गत, राज्यात 1 ते 8 जूनपर्यंत प्रभावी कार्यकर्त्यांसोबत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जातील. 8 ते 12 जूनपर्यंत पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार. विकासतीर्थ यात्रेतंर्गत श्रीपाद भाऊ हे उत्तरेतील आयुष इस्पितळ व मोपा विमानतळास भेट देतील. याशिवाय पक्षाचे विविध आघाडी मोर्चाचे कार्यकर्ता महामेळावे व त्यानंतर कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार केला जाईल.

भिकारीही बाहेरचे

राज्यातील भिकाऱ्यांच्या समस्येवर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना श्रीपाद भाऊ म्हणाले, राज्यातील भिकाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. अनेकांना गाडीमधून आणून ठरावीक जागेवर सोडले जाते. हा विषय गांभीर्याने मी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. याशिवाय रस्त्यावर सापडणारे भिकारी हे गोमंतकीय नाहीत, ते अधिकतर बाहेरील राज्यातील असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT