Goa BJP: कुडतरी मतदारसंघात महाजनसंपर्क अभियानाद्वारे भाजपची मोर्चेबांधणी

अल्‍पसंख्‍यांकांच्या मतांसाठी भाजपचे मिशन कुडतरी
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa Bjp अल्‍पसंख्‍यांक ख्रिस्‍ती मतदारांचा समावेश असलेल्‍या कुडतरी मतदारसंघात भाजपने आपले हात-पाय फैलावण्‍यासाठी महाजनसंपर्क अभियानाचा आधार घेतला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या नेतृत्‍वाची नऊ वर्षे पूर्ण केल्‍याचे निमित्त साधून या मतदारसंघातील महत्‍वाचे नेते आणि लोकांच्‍या गांठीभेटी घेणे भाजपच्‍या राज्‍यस्‍तरीय नेत्‍यांनी मोहीम सुरु केली आहे.

मागचे चार दिवस ही मोहीम या मतदारसंघात नेटाने चालू असून या महाजनसंपर्क अभियानाच्‍या माध्‍यमातून भाजपने जणू मिशन कुडतरी हाती घेतले आहे.

Goa BJP
Morjim : बेकायदा घरे, दुकानांना २ टक्के टॅक्स लावणार

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्‍यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी कुडतरी मतदारसंघातील महत्‍वाच्‍या नेत्‍यांची भेट घेतली होती.

उद्या आणि परवा सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मंत्री निलेश काब्राल आणि पंचायतमंत्री मॉवीन गुदिन्‍हो हे या मतदारसंघात लोकांच्‍या भेटी घेऊन त्‍यांच्‍याशी संपर्क साधणार अशी माहिती स्‍थानिक नेते अँथनी बार्बोझा यांनी दिली.

फातोर्डाचे माजी आमदार आणि प्रदेश भाजप समितीचे सरचिटणीस दामू नाईक, महिला मोर्चाच्‍या उपाध्‍यक्ष डॉ. स्‍नेहा भागवत तसेच कुडतरी मंडळाचे अध्‍यक्ष निळकंठ एकावडे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.

Goa BJP
Goa Crime: जावयाच्या मारहाणीत 64 वर्षीय सासऱ्याचा मृत्यू, थिवी येथील घटना

आज भाजप प्रदेश समितीचे आयोजन सचिव सर्वांनंद भगत यांनी घोगळ-हाऊसिंग बोर्ड येथील महत्‍वाचे स्‍थानिक नेते ॲड. सुभाष काणेकर यांच्‍या घरी भेट देऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

यावेळी मंडळ अध्‍यक्ष निळकंठ एकावडे, महिला विभागाच्‍या अध्‍यक्ष बबिता बोरकर, अनंत रेडकर यांचा समावेश होता.

कुडतरी मतदारसंघात सध्‍या भाजपाला जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहिल्‍यास येत्‍या निवडणुकीत या मतदारसंघात निश्र्‍चितच कमळ फुलेल असा विश्र्‍वास भगत यांनी व्‍यक्‍त केला.

अँथनी बार्बोझा आणि डॉ. स्‍नेहा भागवत यांनी आज राय येथे माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांची भेट घेऊन भाजपच्‍या कार्याची पुस्‍तिका त्‍यांना भेट दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com