Navdurga Temple Madkai Sudin Dhavalikar About Court Order
पणजी: मडकईतील श्री नवदुर्गा देवस्थान परिसरात आज दुसऱ्या दिवशीही चोख पोलिस बंदोबस्त होता. तसेच मंदिर परिसरात शांतता होती. उपरोक्त प्रकरणी मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मत व्यक्त केले आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘देवस्थानच्या ताटात जे काही साहित्य येते, त्यावर सेवेकरी-पुरोहितांचाच हक्क आहे, हे उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेले आहे. आदेशात हे देखील म्हटले आहे की, देवस्थानच्या फंडपेटीत जे काही पैसे येतात ते देवस्थानाला जातील. रविवारी मंदिरात जो काही प्रकार घडला, त्यात सहभागी ग्रामस्थांना कदाचित याची माहिती नसावी’.
श्रीनवदुर्गा संस्थान मडकई येथे गेल्या काही दिवसांपासून महाजन आणि गावकऱ्यांमध्ये मूर्ती हलवण्यावरून वाद सुरु आहेत. न्यायालयाचा आदेश येऊन देखील अद्याप हा वाद मिटलेला नाही. दि. ९ डिसेंबर रोजी मडकई नवदुर्गेच्या मंदिरात पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थ आणि मंदिरांच्या भटजींमध्ये संघर्ष झाला आणि ह्या प्रकारात देवस्थानच्या भटजींना मारहाण करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.