Goa News: पणजी-म्हैसूर बसमधून गोवा बनावटीची अडीच लाखांची दारु जप्त; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News 10 November 2024: गोव्यातील राजकारण, कला-क्रीडा-संस्कृती, गुन्हे, पर्यटन विश्वातील महत्वाच्या बातम्या
Goa News: पणजी-म्हैसूर बसमधून गोवा बनावटीची अडीच लाखांची दारु जप्त; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
LiquorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी-म्हैसूर बसमधून गोवा बनावटीची अडीच लाखांची दारु जप्त!

पणजी-म्हैसूर या कर्नाटकच्या बसमधून तस्करी होणारी अडीच लाख रुपये किमतीची 116.5 लिटर गोवा बनावटीची दारु म्हैसूर येथे जप्त. दोन बसचालकांविरुद्ध गुन्हा नोंद.

म्हादई खोऱ्यात अंदाधुंदी! बेकायदेशीर रेती उत्खननावर वाळपई पोलिसांची कारवाई

म्हादई नदीच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रेती उत्खनन खुलेआम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी, गोमंतक टीव्हीने प्रसारीत केले होते कुडशे गावातील दृष्य. मंगळवारी वाळपई पोलिसांनी हेदोडे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खननाच्या ठिकाणी छापा टाकत रेती आणि एक ट्रक जप्त केला.

कर्लीज बीच शॅक येथील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त!

कर्लीज बीच शॅक येथील बेकायदेशीर बांधकामे बार्देश तालुक्याच्या मामलतदारांनी दिलेल्या आदेशानुसार पाडण्यात आली. पोलिस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली.

तमनार प्रकल्पावर ढवळीकरांची माहिती

तमनार प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे परंतु मुख्य प्रकल्पाचे काम कर्नाटकातून होते .जोपर्यंत ते गोव्याशी जोडले जात नाही तोपर्यंत तमनार प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही उर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती.

रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला दुचाकीवर ट्रिपल सीट मुलांनी दिली धडक

म्हापसा येथील झेवियर्स कॉलेजजवळ रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला स्कूटरवर ट्रिपल सीट बसलेल्या तीन उच्च माध्यमिक शाळेतील मुलांनी धडक दिली.

स्वतंत्र 'पोस्टल सर्कल'साठी प्रयत्न सुरु; मुलख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन

मुळगाव: गोव्यात स्वतंत्र 'पोस्टल सर्कल' स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु. भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनच्या तीन दिवशीय अधिवेशनाला मुळगाव येथे सुरुवात. मंगळवारी (१० डिसेंबर) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन.

GPS GARMIN EDGE 540 घेऊन प्रवास करणाऱ्या परप्रांतीयाविरुद्ध तक्रार दाखल

मोपा विमानतळ पोलिसांकडून झेकच्या एका नागरिकाविरुद्ध मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिबंधित सॅटेलाइट जीपीएस उपकरणासह प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

शिवोलीत सिलेंडरचा स्फोट

शिवोली: उत्तर गोव्यातील शिवोली येथे भाड्याच्या खोलीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सोमवारी (दि.९ डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत लोकं जखमी झाली आहेत .

ट्रेकिंगदरम्यान कोसळून मुंबईतील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 कुंकळ्ळी: दक्षिण गोव्यातील बटरफ्लाय समुद्रकिनाऱ्यावर ट्रेकिंगदरम्यान कोसळून मुंबईतील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com