Tambdi Surla Mahadev Temple Instagram
गोवा

Tambdi Surla: श्रावणात आवर्जुन भेट द्यावे असे काही! गोव्यात असणारे 12 व्या शतकातील प्राचीन महादेव मंदिर

Tambdi Surla Mahadev Temple: मंदिराचा चबुतरा नक्षीविरहीत असून त्याला एकूण दहा स्तंभ आहेत. पैकी चारांवर सुशोभित अशी कोरीव कलाकृतीची बेलबूटी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तांबडीसुर्ल हे जागतिक वारसास्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. येथील श्री महादेव मंदिर हे प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. श्री महादेव मंदिराच्या गर्भगृहात एका चबुतऱ्यार एक भव्य शिवपिंडिका असून मंदिर पूर्वाभिमुखी आहे. खास भोगमंडप नसल्यामुळे सभामंडपाला तिन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. याचा पुढील भाग हेमाडपंथी शैलीचा आहे. श्रावणात भाविक अन् पर्यटक, अभ्यासकही शिवदर्शनासाठी येतात.

एकापरीने निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या पुरातन मंदिरातील श्रींचे दर्शन म्हणजे कैलास मानसरोवरावरील प्रत्यक्ष महादेवाचे दर्शन घेतल्यासारखा आभास होतो, असे शिवभक्तांचे म्हणणे आहे.

असे आहे मंदिर

मंदिराची शिल्पकला व बांधकामाचे सूक्ष्म अवलोकन केले, तर असे वाटते की तत्कालीन शिल्पशास्त्र उच्चस्तराचे होते. सिमेंट व चुना यांचा कुठेही वापर न केलेल्या तरीही आजमितीस उभ्या असलेल्या या मंदिराचा वास्तुविशारद कोण असावा ? कारण यामध्ये वास्तुशास्त्राची सारी वैशिष्ट्ये सामावलेली आहेत.

सभामंडप चौक, अंतराळ, गर्भगृह वैगरे असून दक्षिणी अथवा द्रविड शैलीचे सदर मंदिर आज आपल्या पूर्वजांचा अनमोल सांस्कृतिक वारसा मोठ्या डौलाने मिरवताना दिसून येते.

मंदिराचा चबुतरा नक्षीविरहीत असून त्याला एकूण दहा स्तंभ आहेत. पैकी चारांवर सुशोभित अशी कोरीव कलाकृतीची बेलबूटी आहे. समोर आसनस्थ असलेला नंदी जणू सत्याचा, न्यायाचा मूर्तिमंत उजाळाच ! पहिल्या स्तंभावर कोरलेले हत्तीचे एका अस्वलाला चिरडून ठार मारणारे चित्र पाहून पर्यटक व भाविक भावविभोर होऊन जातात. कोपऱ्यांतील मूर्तीच्या माथ्यावर कीर्तीमुखे असून ती शिवशंकराची प्रतिकात्मक रुपे असल्याचे भासते.

या कीर्तीमुखाने बाजू शोभित केलेली असून त्यांच्या खालच्या काही मूर्ती उभ्या अवस्थेत तर काही आसनस्थ आहेत. मंदिराचा बाह्य आराखडा, खांबांची रचना, त्यांची शिखरशैली, नक्षीकाम व मनमोहकता यांच्या अवलोकनांती सदर मंदिर चालुक्य कदंबाचे आहे, यात जराही संशय नाही.

तत्कालीन कलाकांरानी वास्तूचा प्रत्येक दगड अभियंत्रिकी कौशल्याने बसविलेला असल्यामुळे देवगिरीच्या वास्तुशिल्पेची सारी वैशिष्ट्ये तांबडीसुर्लाला पहावयास मिळतात.

१२ व्या शतकातील या दगडी मंदिराचे बांधकाम थक्क करणारे असून दगड कोरीव कामामुळे सुबक, सुंदर निसर्गाचा परिसर, जवळून वाहणारी रगाडा नदी आणि मंदिराच्या मागे असलेल्या डोंगररांगातील धबधबे यामुळे पर्यटक या भागाकडे फिरकले नाहीत तर नवलच. या मंदिराला पर्यटकाबरेबरच स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही भेट देतात.

सात मूर्ती

उत्तर बाजूने जनार्दन, लक्ष्मी नारायण व गजलक्ष्मी तर पश्चिम बाजूने नृत्य करणारा भोळा शंकर-त्रिपुरारी, शिवपार्वती; हरगौरी ही तीन चित्रे आहेत. दक्षिण बाजूने ब्रह्मा आहे. इथला जनार्दन हा विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक मूर्ती विष्णुस्वरूपात आहे. एक मूर्ती ब्रह्मस्वरूपी व उरलेल्या तीन शिवस्वरूपी आहेत.

कसे पोहोचाल?

धारबांदोडा, मोले अथवा वाळपई मार्गाने तांबडीसुर्ल मंदिराकडे जाता येते. पर्यटकांना मंदिराकडे जाताना वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने त्याना स्वतःच्या अथवा भाड्याच्या वाहनाने जावे लागते. रस्ता धोकादायक वळणाचा व अरुंद असल्याने वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागते.

शब्दांकन - संतोष च्यारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT