पेडणे: गोवा आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-६६ वर एक महिन्यापूर्वी भूस्खलनात खाली आलेला मातीचा ढीगारा अद्याप जैसे थे आहे. न्हयबाग पोरस्कडे, पेडणे येथे महामार्गालगतचा मातीचा ढीगारा मुसळधार पावसाच्या तडाख्यात खाली कोसळला होता. यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
गोवा आणि कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात अनेक ठिकाणी पडझड होण्यासाठी भूस्खलनाच्या घटना घडल्या. मुसळधार पावसात न्हयबाग पोरस्कडे, पेडणे येथे महामार्गालगतचा मातीचा ढीगारा खाली कोसळला. यावेळी मार्गावरुन प्रवास करणारे एक कुटुंब थोडक्यात बचावले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील आमदारांनी याची गंभीर दखल घेतली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यात लक्ष घालून कारवाईची हमी दिली होती. दरम्यान, एक महिना उलटून गेला तरी अद्याप महामार्गावर आलेला मातीचा ढीगारा अद्याप हटविण्यात आलेला नाही.
महामार्गावर आलेला मातीचा ढीगारा जैसै थे असल्याने वाहतूक जुन्याच मार्गावरुन सुरु आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वीच हा नवा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जुना मार्ग निमुळता असल्याने घाटात वाहतूक नेहमीच संथ गतीने होते. तसेच, घाट पार करण्यासाठी विलंब होतो.
एमव्हीआर कंपनीच्या संथ कामामुळे सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी कंपनीवर टीका केलीय. नितीन गडकरी यांना लक्ष घालण्याची विनंती करुन देखील गेल्या एक महिन्यापासून मातीचा ढीग हटवण्यात आलेला नाही.
निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप पोळजी यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.