Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction in Panaji : सांतिनेज अतिक्रमण प्रकरणी संबंधिताला कारणे दाखवा नोटीस

दोन गाळे सुमारे दीड लाख रुपये भाड्याने देण्याचा डाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

Illegal Construction in Panaji: सांतिनेज येथील रस्तारुंदीकरणात गेलेल्या जमिनींवरील दुकाने दुरुस्तीच्या नावाखाली दुकानवजा गाळे काढून बक्कळ भाडे मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन गाळे सुमारे दीड लाख रुपये भाड्याने देण्याचा डाव असल्याचे समजते.

दरम्यान, ‘गोमन्तक’ने हे प्रकरण सातत्‍याने लावून धरल्याने महानगरपालिकेने संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेलेल्या माहितीनुसार, मनपाच्‍या अभियंत्याने त्या बांधकामाचे मोजमाप नेले आहे. महानगरपालिकेत मंत्री बाबूश मोन्सेरात यांची सत्ता आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित व्यक्ती बाबूश यांचेच नाव घेऊन त्या इमारतीची दुरुस्ती केल्याचे सांगत आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत व्यवसाय करू द्यावा अशी विनंती म्हणे त्याने बाबूशना केल्याची चर्चा आहे. परंतु बाबूश अशा बेकायदा कृत्यांना कसे काय पाठीशी घालत आहेत? असा सवाल पणजीकर उपस्‍थित करीत आहेत.

दरम्‍यान, या अतिक्रमणावर हातोडा पडलाच तर साबांखालाही आपल्‍या जवळच्या जागेतील अतिक्रमणावर बुलडोझर फिरवावा लागणार आहे. खात्याचा एक अभियंता या प्रकरणात गुंतला असल्याचे नगरसेवक सांगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT