10 rupees note shortage Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 10 रुपयांच्या नोटांचा तुटवडा

मन:स्‍ताप: उपाययोजनेसाठी म्हापसा व्यापारी संघटनेचा पुढाकार

दैनिक गोमन्तक

म्हापसा: व्‍यवहारात 10 रुपयांच्या चलनी नोटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक या दोघांना नुकसान तसेच मन:स्ताप सहन करावा लागतोय. दहा व वीस रुपयांची नाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही ती फक्त गोव्यातील लोक गैरसमजामुळे स्वीकारत नाहीत. म्हापसा व्यापारी संघटनेने यासंदर्भात दहा व वीस रुपयांची नाणे परत एकदा चलनात स्वीकार करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

म्हापसा व्यापारी संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष श्रीपाद सावंत यांच्या पुढाकाराने यासंदर्भात म्हापसा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी हा विषय मांडला. चलनातील दहा व वीस रुपयांच्या नाण्यांचा व्यापारी स्वीकार करतील असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला आहे. गोव्यातील बसवाहतूकदार दहा रुपयांचे नाणे नाकारत असल्याने ग्राहकही सदर नाणी स्वीकारण्यास मनाई करतात. काही बँकांही ग्राहकांकडून ही नाणी स्वीकारण्यास राजी नसतात, ही बाब व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली व शासकीय पातळीवर प्रकत्न करावा असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचवले.

सर्व व्यापारी, रिक्षा, बसवाहतूक व्यावसायिक, ग्राहक व सर्वसामान्य नागरिकांनी दहा व वीस रुपयांची नाणी चलनात स्वीकारावी व त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. सुट्ट्या पैशांच्‍या समस्येवर हाच एकमेव उपाय आहे.

- श्रीपाद सावंत,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT