Babasaheb Purandare Dainik Gomantak
गोवा

'इतिहासाप्रती सजगता-तत्‍वनिष्ठा जपून महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणला'

पन्नास वर्षांचे आयुष्य जगलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगासमोर आणण्यासाठी परमेश्‍वराने बाबासाहेब पुरंदरे यांना दुप्पट आयुष्य दिले

दैनिक गोमन्तक

फोंडा : आयुष्याचे शतक गाठलेले इतिहासतज्ज्ञ आणि शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चार पिढ्यांपर्यंत पोहोचविले. हा एक इतिहास असून बाबासाहेब पुरंदरेंचे नाव इतिहासातून पुसले जाणार नाही, उलट शिवाजी महाराजांचे ज्यावेळी नाव घेतले जाईल, त्या वेळेला पुरंदरेंचे स्मरण केले जाईल, असा दावा पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार (journalist) व संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी केला.

शिवाजी महाराजांचा आदर्श युवा पिढीसमोर ठेवताना बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाचा (History) ग्रंथच सर्वांसमोर ठेवला, असे सागर देशपांडे यांनी पुढे बोलताना सांगितले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात काल विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी, कृतार्थ म्हार्दोळ आणि मारवा क्रिएटिव्ह ट्रस्ट फोंडातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सागर देशपांडे बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कृतार्थचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी जाणता राजा या महानाट्यानंतर गोव्यात ‘संभवामी युगे युगे’ हे महानाट्य उभारले गेले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदर्शानुसारच हे कार्य झाले आणि त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचा सहवास कसा लाभला, त्यासंबंधीच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले.

म्‍हणून परमेश्‍‍वराने दुप्‍पट आयुष्‍य दिले?

सागर देशपांडे म्हणाले की, पन्नास वर्षांचे आयुष्य जगलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगासमोर आणण्यासाठी परमेश्‍वराने बाबासाहेब पुरंदरे यांना दुप्पट आयुष्य दिले. त्यामुळे बाल ते युवा वर्गापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास समग्रपणे समोर आला. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ काटेकोरपणे पाळण्यासाठी बाबासाहेबांकडून शिकावे, एवढा हा महान चरित्रकार होता, असे देशपांडे यांनी सांगितले.

इतिहासाप्रती सजगता, तत्‍वनिष्ठा

बाबासाहेब पुरंदरे यांचा आदर्श जपण्यासारखा असून इतिहासाप्रती बाबासाहेबांनी जी सजगता दाखवली आणि तत्वनिष्ठा जपून शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणला. बाबासाहेबांचा हा आदर्श आजच्या संशोधकांनी जपला पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे, असे गोमंतकीय सुपुत्र तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नमूद केले आहे, त्याची आठवणही सागर देशपांडे यांनी करून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ऑलिम्पिकसाठी गोव्याला सज्ज करा'! रॅकेट खेळांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्याची खासदार तानावडेंची राज्यसभेत मागणी

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT