शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचविले : राज ठाकरे

बाबासाहेबांनी आपल्याला इतिहास हा नुसता वाचायचा नसतो तर तो जगायचा असतो हे शिकविले. त्यांनी आपल्याला इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पध्दतीने सांगितला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे, अशिष शेलार,गजानन मेहेंदळे आदी उपस्थित होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे, अशिष शेलार,गजानन मेहेंदळे आदी उपस्थित होते. Dainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: लहानपणी शिवाजीपार्कवर मी रोज शिवराज्याभिषेक सोहळा पाहायला जायचो. मी ६ वर्षाचा असताना बाबासाहेबांना पहिल्यांदा पहिले. त्यावेळी ते शिवाजी महाराजांची भूमिका करायचे. तुम्ही करत असलेल्या कार्यला पाहून आम्हाला या वयात देखील हुरूप येतो. इतिहासाचा दाखला देत बाबासाहेब वर्तमानात कसे जगायचे ते शिकवितात. शिवशाहीर बाबासाहेब यांच्या शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्याला इतिहास हा नुसता वाचायचा नसतो तर तो जगायचा असतो हे शिकविले. त्यांनी आपल्याला इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पध्दतीने सांगीतला. त्यांनी इतिहास सांगताना तशी भाषा वापरली नसती तर तो आपल्याला समजलाच नसता. शिवचरित्र बाबासाहबांनी घरोघरी पोहोचवले. असे राज ठाकरे यांनी नमूद केले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात त्यांच्या शैलीत केली. ते म्हणाले, अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या माझ्या बंदी भगिनींनो हे ऐकताच उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे, अशिष शेलार,गजानन मेहेंदळे आदी उपस्थित होते.
"बाबासाहेब पुरंदरे यांना माझा साष्टांग नमस्कार" मोदींच्या बाबासाहेबांना मराठमोळ्या शुभेच्छा!

जगप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या शतकमहोत्सवी वर्षाची (Centennial year) सुरुवात मोठ्या थाटामाटात झाली असून जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधार या संस्थांनी संयुक्त विद्यमाने बाबासाहेब पुरंदरे यांचा भव्य सत्कार पुण्यातील सरकार वाडा, शिवसृष्टी, आंबेगाव येथे प्रख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले (Playback singer Padma Vibhushan Asha Bhosle) यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray), ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे (Senior historian Gajanan Mehendale), भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार (Former Minister Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी आणि पाहुण्यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरेलिखीत यांच्या ‘ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे, अशिष शेलार,गजानन मेहेंदळे आदी उपस्थित होते.
'फडणवीस हे काही आडनावं नाही': राज ठाकरे

आज मी जे मराठी बोलू शकते ते या लेखकांमुळेच असे सांगत आशा भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, माझी आणि बाबासाहेब यांची ओळख 58 वर्षांची आहे. असे सांगत आशाताईंनी कानडा ओ विठ्ठलु कर्नाटकु... या गाण्याचा देखील इतिहास उलगडून सांगितला. आपण अनेक दा म्हणतो ही गोष्ट मी उद्या करतो पण उद्या कधी नसतो. तो आजच असतो. आपण स्वच्छ मनाचे राहिले पाहिजे. या लेखकांनी माझे आयुष्य समृध्द केले आहे. आणखीन 50 वर्षे मी जगेन त्यातील 25 वर्षे मी बाबासाहेब पुरंदरे यांना देते. असे त्यांनी यावेळी सांगितले.

अशिष शेलार म्हणाले, बाबासाहेब म्हणजे प्रचंड सहनशील, दयावान, आणि क्षमा देणारे असे आहेत. पण त्यांच्या इतिहासाच्या लेखनाबद्दल काही नतद्रष्टांनी सपासप वार केले. पण मला कुठल्याही वादात पडायचे नाही. बाबासाहेब म्हणजे ऋषितुल्य व्यतिमत्व आहेत.

यावेळी ‘शिवकल्याण राजा’ हा सांगीतिक कार्यक्रमसुद्धा पार पडला. सोनाली कर्णिक, अजित परब, नचिकेत देसाई या गायकांनी प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनाखाली गीते सादर केली. संजय उपाध्ये आणि श्रीराम केळकर यांनी यावेळी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम कोविड-१९ चे सर्व नियम पाळून पार पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com