जगप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या शतकमहोत्सवी वर्षाची (Centennial year) सुरुवात मोठ्या थाटामाटात झाली असून जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधार या संस्थांनी संयुक्त विद्यमाने बाबासाहेब पुरंदरे यांचा भव्य सत्कार पुण्यातील सरकार वाडा, शिवसृष्टी, आंबेगाव येथे प्रख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray), ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे (Historian Gajanan Mehendale), भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी आणि पाहुण्यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरेलिखीत यांच्या ‘ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (Thoughts of world famous Shiv Shahir Babasaheb Purandare)
या कार्यक्रमावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले मोनगत व्यक्त केले, "जगात अशी पाच ते सात जण आहेत ज्यांना मी आरे-जारे म्हणू शकतो, त्यापैकी आशा, उषा, लतांसारखे काही निवडक लोकं आहे. एकदा कोणाचा आवाज आवडतो असे विचारले असता, सेकंदात मी उत्तरलो 'कपबशांचा'. ज्या गमती जमती केल्या ते वातावरण माझ्यासाठी खूप छान होत. याच वातावरणात माझ आयुष्य गेलं शिवाजी महाराजांचा नाद लागला तो वडीलांमुळे आणि तो वाढला या गाण्यांमुळे. आता मी जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला काम करायचयं खूप काम करायचंय. मंगेशकर म्हणजे गाण नव्हे तर ती वेगळीसंस्कृती आहे वेगळा विचार आहे धन आहे. मंगेशकरांच आणि पुरंदरेंच किती जिव्हाळ्याच नात आहे ते माझ्या लक्षात आहे."
"वेड्या लोकांनी इतिहास घडवलाय आणि वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मी शिवाजी महाराजांचा पुजारी किंवा गुलाम नाही, मी भक्तही नाही; मात्र ते मला आवडातात. त्यांच्या पराक्रम मला आवडतो. त्यांचे धाडसी निर्णय मला आवडतात कारण त्यांची राष्ट्र निर्मितीची भावना खूप मोठी आहे. तेव्हा आपण शिवाजी महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारख आहे. राज ठाकरेंसारखी माणस महाराष्ट्रात आहेत. आणि त्यांच्या कडूनही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत."
दरम्यान मीही गाणार होतो असे म्हणत त्यांनी आपल्या गाण्याविषयीची आवड व्यक्त केली. "माझाही आवाज चांगला होती पण ही मुलं मागे पडतील म्हणून मी गाण सोडल, असा विनोदही त्यांनी यावेळी केला. माझ्या आईवडीलांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी वडिलांचा हातचा मार खाला पण 'आरे' म्हणवून घेतलं नाही.असा काहीसा कौटूंबिक किस्सा ही त्यांनी यावेळी सांगितला. 'मागे उभा मंगेश' गाऊन आशाताईंनी बाबासाहेबांना मोठी भेट दिली. त्यावेळी आशा ताईंच प्रेम मी कधी विसरणार नाही." असे उद्गार बाबासाहेबांनी काढले.
"अशी मैत्री असं प्रेम आम्हाला लाभलं म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, अशा माणसांच्या सानिध्यात आणखी आणकी जगाव वाटतं. आशा ताईंवर मी एक लेक लिहीणार आहे आणि मी तो 'जडणघडण'मध्ये प्रसिद्द करणार आहे. अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषा मरीठी कतृत्व मला प्रेरणा देणाऱ्याआहे. सगळ्यांचा जिव्हाळा प्रेम मला कायमच लाभो," अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर त्यांनी, प्रेम करायला शिका, प्रेम कर म्हणून शिकवाव लागत नाही आणि विनोद कर म्हणजे मी हसतो असं सांगाव लागत नाही. असं म्हणत पसमाजात प्रेमाची गरज आहे आणि ते प्रेम आपल्यात निर्माण करा असा संदेश दिला. कुणाचा राग, द्वेश नको चोहीकडे प्रमे आणि प्रेमच असू दे. तुम्हा सगळ्यांच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी सुखी आनंदी, समाधानी आणि तृप्त आहे, असे म्हणत बाबासाहेबांनी आपले मनोगत व्कय करतांनी विराम घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.