Shiv Mandir Palkhi' festival old goa  Dainik Gomanak
गोवा

Old Goa : ओल्ड गोवा शिवमंदिरात पालखी सोहळा उत्साहात

पालखी सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकांनी लावली हजेरी

दैनिक गोमन्तक

वास्को: अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम उपपीठ गोवा यांच्या भक्तसेवा मंडळातर्फे ओल्ड गोवा येथील गोवा उपपिठावर शिवमंदिरात नवसाची पालखी उत्सव सोहळ्यात भाविक, भक्त झाले मंत्रमुग्ध.

(Shiv Mandir Palkhi' festival was celebrated with enthusiasm at Old Goa)

दर महिन्याच्या अमावास्येला शिवमंदिर सभोवताली पालखी परिक्रमा केली जाते. सप्टेंबर महिन्यातील साजरा करण्यात येणाऱ्या नवसाची पालखी उत्सव सोहळ्याचे यजमानपद काणकोण तालुक्याला लाभले होते. आज रविवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक भक्त हितचिंतक टाळ मृदुंग दिंडिच्या गजरात न्हाऊन गेले होते.

या पालखी सोहळ्याला गोवा जिल्ह्यासहीत सिंधुदुर्ग जिल्ह्या, बेळगांवी, उत्तर कन्नड,जोयडा, कारवार मधिल भाविक भक्त, हितचिंतकांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. गोव्यातील भक्त, भाविक, हितचिंतकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती तसेच गोव्यातील हिंदू संग्राम सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती प्रामुख्याने लावली जाते.

Shiv Mandir Palkhi' festival

बेळगाव शहर, ग्रामीण, जोयडा, उत्तर कन्नड, कारवार या जिल्ह्यातील ही संग्राम सैनिक आपापली सेवा करण्यासाठी पालखी सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात.व आपापल्या सेवा उत्कृष्टपणे करण्यासाठी सज्ज असतात. त्याप्रमाणे नवसाची पालखी सोहळा असल्याने नव - नवीन भाविक, हितचिंतक नवस करण्यासाठी व केलेले नवस श्रींच्या चरणी अर्पण करण्यासाठी येत असतात. प्रत्येक अमावास्येला भाविक हितचिंतक मोठ्या संख्येने येत असतात व श्री चरणी नवस केला जातो व तो पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या अमावास्येला तो नवस फेडला जातो.

Shiv Mandir Palkhi' festival

नवसाची पालकी उत्सव सोहळ्याला सकाळी काकड आरतीने सुरुवात‌ करण्यात आली. तद्नंतर होम हवन षडोशोपचार पूजा करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अभिषेक करण्यात आले. दुपारी व रात्री महानैवेद्याचा कार्यक्रम केला जातो, संध्याकाळी ठिक 5 वाजता ढोल ताशांच्या गजरात, ताळ मृदुंग ताला सुरात भोलेनाथांची व प.पू. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांची मंदिराच्या परिसरात पालखीतून परिक्रमा काढण्यात येते.

भक्त, शिष्य, साधक हितचिंतक नाचण्यात मंत्रमुग्ध होऊन आपले पूर्ण देहभान विसरून पालखी परिक्रमा करताना दिसतात. शिष्य, साधक, भाविक, भक्त, हितचिंतक मोठ्या संख्येने व उत्साहात नवसाच्या पालखी सोहळ्याला उपस्थित असतात. आजच्या नवसाच्या पालखी सोहळ्याला 3100 ते 3700 भाविकांची उपस्थिती लाभली होती. संध्याकाळी 7 वाजता सांजारती तद्नंतर श्रींच्या भेटीस आलेल्या वस्तूंची पावणी घालण्यात येते व शेवटी गाऱ्हाणे घालून पालखी उत्सव सोहळा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT