Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा; रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने मिळणार डिस्चार्ज

CM Pramod Sawant Discharge News: पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आजच (20 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आजच (20 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. गुरुवारी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर यशस्वीरित्या 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे सर्व 'रुटीन चेकअप' आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे सर्व रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरीरातील रक्तभिसरण आणि हृदयाची गती आता पूर्णपणे पूर्वपदावर आली असून त्यांना कोणतीही शारीरिक अस्वस्थता जाणवत नाहीये. डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकाने मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Goa CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

काल यशस्वीरित्या पार पडलेल्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, आज सकाळपासूनच त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना विशेष कक्षात हलवण्यात आले. मुख्यमंत्री स्वतः आता चालू-फिरु शकत असून त्यांनी आपल्या कामाचे काही अपडेट्सही घेतल्याचे बोलले जात आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने लवकरच त्यांच्या डिस्चार्जबाबतचे अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी केले जाण्याची शक्यता आहे. एवढचं नाहीतर डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस धावपळ टाळून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com