Ganapatrao Ranesardesai : विद्यादानाचे कार्य निरंतर ठेवणार

प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या विश्वासात घेऊन विद्यादानाचे कार्य करणार
Shree Ram Shikshan Sanstha Khadki
Shree Ram Shikshan Sanstha KhadkiDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीराम विद्यालय खडकी आणि श्रीराम शिक्षण संस्था खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव कुष्ठोबाराव राणे सरदेसाई आणि खोतोडे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच श्री नामदेव विश्वासराव राणेसरदेसाई यांचा सत्कार करण्यात आला.

( Teachers were felicitated at Shree Ram Shikshan Sanstha Khadki )

Shree Ram Shikshan Sanstha Khadki
Dabolim Airport: विमानतळ प्राधिकरणाने आयातदारांना गोदामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी

या सोहळ्याला व्यासपिठावर श्रीराम शिक्षण संस्था खडकीचे अध्यक्ष श्री. प्रतापराव राणे सरदेसाई, उपाध्यक्ष श्रीमती सिताबाई राणेसरदेसाई, व्यवस्थापक श्री अनंतराव राणे सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतापराव राणेसर देसाई त्यांच्या हस्ते श्री गणपतराव राणेसरदेसाई, श्री नामदेव राणे सरदेसाई या दोन्ही सत्कारमूर्तीचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना गणपतराव राणे सरदेसाई म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या विश्वासात घेऊन विद्यादानाचे कार्य निस्वार्थीपणाने व निरंतर करावे, विद्यादानाचे कार्य आजपर्यत करत आलो ते निरंतर ठेवणार.

Shree Ram Shikshan Sanstha Khadki
Goa Betel Nut Crop : हवामान बदलाने सुपारीचे नुकसान थांबेना; शेतकरी धास्तावले

या प्रसंगी सत्कार मूर्ती श्री नामदेव राणेसरदेसाई यांनीही आपल्या मनोगतातून लोकांची चांगली सेवा करण्याची संधी मिळाली असून सरकार दरबारी लोकांची जी जी कामे असणार ती पूर्ण करून घेण्यास प्रयत्नशील राहणार असे म्हटले. अध्यक्षीय भाषणात प्रतापराव राणे सरदेसाई यांनी सत्कारमूर्ती गणपतराव राणे सरदेसाई यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी योग्य ते मार्ग दर्शन विद्यार्थ्यांना करावे असे आवाहन केले.

यावेळी ज्ञानसागर विद्यामंदिर तार सोनाळ सावर्डेचे व्यवस्थापक रामराव राणे सरदेसाई यांनी विचार मांडले. विद्यार्थ्यांच्यावतीने कु.व्रजराज हजारे व कु.प्रेरणा गावकर यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे व्यवस्थापक श्री अनंतराव राणे सरदेसाई यांनी गणपतराव राणे यांच्या शिक्षकी पेशातील कार्याची माहिती करून दिली. मुख्याध्यापक शिवाजी देसाई यांनी सरपंच नामदेव राणे यांच्या कार्याचा आढावा घेतला. सत्कार सोहळा श्रीराम विद्यालय येथील खड‌की येथे शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com