VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Vaibhav Suryavanshi Batting Viral Video: आयपीएलच्या 19व्या हंगामापूर्वीच वैभवने पुन्हा एकदा आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली असून सराव सत्रात त्याने दाखवलेला आक्रमक पवित्रा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Vaibhav Suryavanshi Batting Viral Video
Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Batting Viral Video: भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर चमकणारा नवा तारा वैभव सूर्यवंशी याने गेल्या वर्षभरात आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. वयाने लहान असला तरी मैदानावर मोठमोठ्या गोलंदाजांची दाणादाण उडवण्याची त्याची शैली पाहून क्रिकेट तज्ज्ञही थक्क झाले आहेत. विशेषतः देश-विदेशातील दिग्गज गोलंदाजांविरुद्ध त्याने ज्या प्रकारे चौकार-षटकारांची बरसात केली, त्यामुळे आगामी आयपीएल (IPL 2026) हंगामात त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

गेल्या हंगामात वैभवने आपल्या अफाट क्षमतेची झलक दाखवून दिली होती, जेव्हा तो स्पर्धेतील दुसरा सर्वात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू ठरला होता. आता आयपीएलच्या 19व्या हंगामापूर्वीच वैभवने पुन्हा एकदा आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली असून सराव सत्रात त्याने दाखवलेला आक्रमक पवित्रा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Vaibhav Suryavanshi Batting Viral Video
IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

या वेळच्या आयपीएल हंगामापूर्वी एक मोठी घडामोड घडली असून अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला ट्रेड डीलच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. जडेजा आता राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे, मात्र स्पर्धेच्या अधिकृत सुरुवातीपूर्वीच त्याला एका तरुण खेळाडूच्या तडाख्याला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सच्या नेट्समध्ये सराव करताना रवींद्र जडेजा आणि वैभव सूर्यवंशी आमनेसामने आले होते.

जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असलेल्या जडेजाच्या गोलंदाजीवर वैभवने ज्या निर्भीडपणे फलंदाजी केली, त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. या सराव सत्रात वैभवने जडेजाच्या फिरकीचा सामना करताना चेंडू सीमापार धाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनुभवी जडेजाच्या चेंडूंवर वैभवने ज्या सहजतेने मोठे फटके मारले, ते पाहून राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार.

Vaibhav Suryavanshi Batting Viral Video
MS Dhoni: "धोनी घेणार रिटायरमेंट"! माजी खेळाडूने केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, IPL आली की तो..

वैभव सूर्यवंशीच्या आयपीएलमधील आकडेवारीवर नजर टाकली तर त्याचे रेकॉर्ड्स अत्यंत प्रभावी दिसतात. आतापर्यंत त्याने केवळ एकाच हंगामात आपला खेळ दाखवला असला तरी, त्या अल्पशा कालावधीत त्याने आपली छाप सोडली आहे. गेल्या हंगामात 7 सामने खेळताना त्याने 206 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 252 धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे या दरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतकही झळकले होते. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, वैभव हा केवळ टिकून खेळणारा फलंदाज नसून तो पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर दबाव टाकण्याची क्षमता ठेवतो.

Vaibhav Suryavanshi Batting Viral Video
IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

येत्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची धुरा वैभवच्या खांद्यावर मोठी असेल, कारण तो सलामीला येण्याची दाट शक्यता आहे. मैदानावर त्याला भारताचाच दुसरा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल याची साथ लाभणार आहे. जयस्वाल आणि सूर्यवंशी ही जोडी आयपीएलमधील सर्वात घातक सलामी जोडी ठरु शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. एका बाजूला जयस्वालचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला वैभवची निडर वृत्ती यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना रणनीती आखणे कठीण जाणार आहे. रवींद्र जडेजासारख्या दिग्गज गोलंदाजाला सरावात लोळवल्यानंतर वैभवचा आत्मविश्वास गगनाला भिडला असून, आता प्रत्यक्ष सामन्यात तो काय कमाल करतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com