Goa Lairai Jatra Stampede Dainik Gomantak
गोवा

Thivim: आनंदात काढला ग्रुप फोटो, ठरला अखेरचा! लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत थिवीतील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

Goa Lairai Jatra Stampede: शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्‍या ६ मृतांपैकी तिघेजण थिवी गावातील आहेत. त्‍यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे.

Sameer Panditrao

थिवी: शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्‍या ६ मृतांपैकी तिघेजण थिवी गावातील आहेत. त्‍यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे. तनुजा कवठणकर (५२), आदित्‍य कवठणकर (१६, दोघे रा. अवचीतवाडो-थिवी) व यशवंत केरकर (४६, माडेल- थिवी) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण येथील शिवराकवाड्यावरील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या प्रांगणात व्रत पाळायचे.

यावर्षी थिवीसह २५० पेक्षा अधिक धोंड भक्त गण या तळावर व्रत पाळत होते. जत्रेच्या दिवशी हे सर्व भक्त गण शिरगावला जायला निघाले. चेंगराचेंगरी झाली तेव्हा या तळावरील बहुतेक धोंड भक्तगण एकत्र होते. त्यामुळेच यातील बहुतेक जखमी थिवी गावातील आहेत.

यशवंत प्रभाकर केरकर हे गेल्या २५ वर्षांपासून देवी लईराईचे व्रत पाळत होते. जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला जाण्याअगोदर ६ वाजता घरी येऊन आजारी वडील प्रभाकर केरकर, आई प्रभावती, पत्नी यशिता, मुलगी रिशिता, (११) मुलगा यशवित (७) व जत्रेसाठी घरी आलेली बहीण यांच्यासोबत आनंदाने एक ग्रुप फोटो घेतला.

त्‍यानंतर पत्नी, मुलगी व मुलाला घेऊन ते देवीच्या दर्शनाला गेले. पहाटेच्या वेळी होमकुंडातून प्रवेश करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला नेहमीच्या ठिकाणी एकत्र थांबायला सांगून स्वःता देवीचा कौल घ्यायला गेले ते परत आलेच नाहीत. शेवटी सापडला तो त्‍यांचा मृत इस्‍पितळात. त्यांची सासुरवाडी मये गावची असल्याने ठाणेकर कुटुंबीयांनी इस्‍पितळात एकच गर्दी केली. त्‍यांचा मृतदेह घरी आणल्यावर अनेकांना दुःख अनावर झाले. बायको, आई, बहीण व लहान दोन मुलांचा आक्रोश मन हेलावून गेला.

तनुजा श्याम कवठणकर ही आदित्य यांची काकी. गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्रत करायच्या. त्यांच्यामागे त्यांचे पती श्याम कवठणकर व दोन मुली. त्यातली छोटी मुलगी रुतिका, जी नववीत शिकते ती गेल्या चार वर्षांपासून आपल्या आईसोबत व्रतस्‍थ राहत होती.

Pilgao Youth Death Goa Stampede

जत्रेच्या दिवशी दोघी संध्याकाळी घरी गेल्या, सर्वांसोबत एक फोटो घेतला व देवीच्या दर्शनाला निघाल्‍या. पहाटे मायलेक देवीचा कौल घेऊन होमकुंडात प्रवेश करण्यासाठी जात असता वाटेत झालेल्‍या चेंगराचेंगरीत तनुजा यांचा मृत्यू झाला तर मुलगी रुतिका हिचा पाच फ्रॅक्चर झाला. कुणीतरी तिला त्या चेंगराचेंगरीतून ओढून काढल्यामुळे ती बचावली. इस्‍पितळात असल्‍यामुळे तिला आपल्या आईचे व चुलत भावाचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. माडेल येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले.

सदानंद शेट तानावडे यांनी तातडीने घेतली इस्‍पितळांकडे धाव

ही दुःखद बातमी समजताच माजी स्‍थानिक आमदार तथा विद्यमान राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी प्रथम म्हापसा येथील जिल्हा इस्‍पितळात जाऊन डॉक्टरांना भेटून चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांसोबत जाऊन प्रत्येक जखमींची चौकशी केली व त्‍यांना तसेच त्‍यांच्‍या नातेवाईकांना धीर दिला. मृत पावलेल्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी गोमेकॉत जाऊन जखमींची चौकशी केली. त्‍यांनाही धीर दिला. शवागारात जाऊन लवकरात लवकर मृत पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह त्‍यांच्‍या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी थिवीतील मृत पावलेल्या तिन्ही जणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्‍यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यांनीही या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

दहावीच्‍या परीक्षेत आदित्‍यची बाजी

१.आदित्य अंकुश कवठणकर (१६) हा मुलगा यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मोठ्या आनंदाने पुढील शिक्षणासाठी म्हापसा येथील वालावलकर उच्च माध्‍यमिक विद्यालयात अकरावीच्या वर्गात त्‍याने प्रवेश घेतला होता. त्याचे वडील अंकुश कवठणकर हे गेली २८ वर्षे धोंड म्हणून देवीचे व्रत पाळतात. गेल्या चार वर्षांपासून आदित्यनेही व्रत ठेवायला सुरवात केली. दोघेही शिवराकवाडा थिवी येथील श्री राष्ट्रोळी देवाच्या तळावर व्रतस्‍थ रहायचे.

२.जत्रेच्या दिवशी दोघेही घरी येऊन जाण्याअगोदर सर्वांबरोबर एक ग्रुप फोटो घेऊन देवीच्या दर्शनाला गेले. रात्रभर एकत्रच होते. परंतु देवीचा कौल घेतल्यावर होमकुंडात प्रवेश करण्यासाठी जाताना दोघांची चुकामूक झाली व त्याचवेळी आदित्य त्या चेंगराचेंगरीत सापडला व काळाने घाला घातला. वडील आपल्या मुलाला वेड्यासारखे शोधत होते. परंतु आदित्य सापडला तो मृतावस्थेत. घरी आई व बहीण. वडील मिळेल त्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतात व कसेबसे कुटुंब चालवतात. आदित्य हाच त्यांचा पुढचा आधार होता. परंतु तोच आधार गेल्याने आई-वडिलांवर आभाळ कोसळले आहे. आज शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT