inquiry committee report Goa Dainik Gomantak
गोवा

Lairai Stampede:"अशा घटना न घडण्याची सरकार खबरदारी घेईल" मुख्यमंत्र्यांकडून शिरगाव जत्रोत्सवातील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन

Goa stampede update: समितीमार्फत दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून अहवाल उद्या म्हणजेच सोमवारी (दि.०५) सरकारसमोर सादर केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं

Akshata Chhatre

साखळी: देवी लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीमार्फत दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून अहवाल उद्या म्हणजेच सोमवारी (दि.०५) सरकारसमोर सादर केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

सावंत यांनी चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या सुर्या नयेकर यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, जत्रोत्सवात धोंड, भाविक आणि प्रशासन यांच्याकडून अधिक जागरूकता व शिस्त आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेली दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या कुटुंबीयांना बारा दिवसांनंतर वितरित केली जाईल. तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेणार आहे, असेही ते म्हणाले.

धोंडगणांकडून हकिकत

जखमी धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना चेंगराचेंगरीवेळी पडलेली संपूर्ण हकिकत कथन केली. चेंगराचेंगरी झाली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हवी तशी प्रथमदर्शनी मदत केली नाही. उलट आम्हालाच उलट उत्तरे देण्यात आली.

आम्हीच आमच्या माणसांना घेऊन उपचारासाठी धावत सुटलो. पोलिसांची गाडीही सुरू होत नव्हती. नंतर अधिकारी वर्ग घटनास्थळी धावून आल्यानंतर पोलिसांनी मदतीचा हात दिला, असे या धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

गोवा फाउंडेशनची सरकारवर टीका

जत्रोत्सवावेळी चेंगराचेंगरीमुळे ७ जणांच्या झालेल्या मृत्यूबद्दल गोवा फाऊंडेशनने दुःख व्यक्त केले आहे. आजचे राजकारणी केवळ सध्याच्या पिढीच्या जीवनाचा दर्जाच नष्ट करत नाहीत तर भावी पिढ्यांच्या सर्व शक्यता देखील नष्ट करतात, अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांच्या घरी तसेच जखमींची इस्पितळात आऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले असले तरी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या जीवांवरच नव्हे तर खाण व्यवसायामुळे शिरगाव ऐतिहासिक देवी लईराई मंदिराच्या होणाऱ्या विध्वंसावरही चिंतन करा, असे आवाहनही गोवा फाऊंडेशनने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT