Lairai Jatra Stampede: लईराई देवस्थान समितीचा मोठा निर्णय, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर वडाचावाडा परिसरात स्टॉल घालण्यास बंदी

Shirgao Lairai Jatra Stampede: मुड्डी ते वडाचावाडा-शिरगाव येथील होमकुंड स्थळापर्यंत स्टॉल थाटण्यास बंदी घालण्यात येईल, असा निर्णय श्री लईराई देवस्थान समितीने घेतला आहे.
Lairai Jatra Stampede
Lairai Jatra StampedeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: शिरगाव येथील दुर्घटनेनंतर पुढील वर्षांपासून मुड्डी ते वडाचावाडा-शिरगाव येथील होमकुंड स्थळापर्यंत स्टॉल थाटण्यास बंदी घालण्यात येईल, असा निर्णय श्री लईराई देवस्थान समितीने घेतला आहे.

शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. या चेंगराचेंगरीत सहा धोंड भाविकांचे बळी गेले आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दुर्घटनंतर फेरीतील स्टॉल बंद ठेवण्यात आले होते.पहाटेपासून गावात शुकशुकाट पसरला होता.

दुसऱ्याबाजूने कौलोत्सवावेळी गावाबाहेरील भाविकांनी शक्यतो शिरगावात येण्याचे टाळावे. शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ६) देवीचा कळस मंदिरात प्रवेश करतेवेळी तर भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही देवस्थान समितीने केले आहे.

Lairai Jatra Stampede
Super Cup: जल्लोष! FC Goa ने रचला इतिहास; दोनवेळा सुपर कप पटकावणारा ठरला पहिला संघ

दरम्यान, या दुर्घटनेबाबत देवस्थान समितीने दुःख व्यक्त केले आहे. बळी पडलेल्या भक्तगणांना देवस्थान समितीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या दुर्घटनेला देवस्थान समिती किंवा प्रशासन जबाबदार नसल्याचा दावाही देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि अन्य मान्यवरांनी केला आहे.

दुर्घटनेनंतर संपूर्ण शिरगाव गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. आज दिवसभर तर गावात शुकशुकाट दिसून येत होता. त्यातच देवीच्या कौलोत्सवाला परंपरेप्रमाणे सुरवात झाली आहे. चार दिवस साजरा होणाऱ्या या कौलोत्सवाची मंगळवारी मध्यरात्री सांगता होणार आहे.

Lairai Jatra Stampede
Goa Congress: मटकाविरोधी कारवाईची सरकारला आताच का जाग? काँग्रेस सरचिटणीसांचा सरकारवर हल्लाबोल

शिरगावात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित अशी आहे, असे श्री लईराई संस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेला प्रशासन किंवा देवस्थान समिती जबाबदार नाही, तर काही भक्तगणांच्या अतीउत्साहामुळे ही दुर्घटना घडली, असा दावाही त्यांनी केला. कौलोत्सवावेळी भाविकांनी संयम पाळावा, असे आवाहनही अध्यक्ष गावकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 97 Voters Electoral Roll
Porvorim Elevated Road Traffic Management
EPF wage ceiling hike 2026
House Of Abhinandan Mega project Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com