Pilgao Youth Death Goa Stampede  Dainik Gomantak
गोवा

Pilgao: 'आई मी परत येतो' म्हणाला, पण परतलाच नाही! शिरगाव दुर्घटनेत पिळगावच्या तरुणाचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Goa Lairai Jatra Stampede: एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या सागरचे यंदा लग्न करण्याची तयारी सुरू होती. त्‍यापूर्वीच क्रूर काळाने त्‍याच्यावर झडप घातली.

Sameer Panditrao

डिचोली: वयस्‍कर आईचा आशीर्वाद घेऊन व ‘मम्मी, मी येतो’ असे सांगून शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेला गेलेला माठवाडा-पिळगाव येथील धोंड भक्त सागर नंदुर्गे (वय ३० वर्षेे) हा युवक पुन्हा घरी परतलाच नाही. चेंगराचेंगरीत त्‍याच्‍यावर क्रूर काळाने झडप घातली.

सागर याच्यामागे वयोवृद्ध आई आणि एक बहीण (विवाहित) आहे. सागर हा एकुलता एक मुलगा आणि बहिणीचा लाडका भाऊ. शिरगाव येथील दुर्घटनेत सागरचा बळी गेल्याने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आता मला ‘मम्मी’ म्हणून कोण हाक मारणार, असा तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहे. या दुर्घटनेत माठवाडा-पिळगाव येथील पाच धोंड भक्तगण जखमी झाल्याचे सांगण्यात आलेे.

Lairai Jatra Stampede

घरात लग्नाची तयारी झाली होती सुरू

एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या सागरचे यंदा लग्न करण्याची तयारी सुरू होती. त्‍यापूर्वीच क्रूर काळाने त्‍याच्यावर झडप घातली. शवचिकित्सा करून मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केल्यानंतर स्थानिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात सागरच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

गेल्या वर्षी बनला होता धोंड; पिळगावात शोककळा

सागर हा गेल्या वर्षी श्री लईराई देवीचा धोंड झाला. यंदा त्याचे दुसरे वर्ष होते. वाड्यावरील अन्य धोंड भक्तांसह तो तेथीलच तळीवर देवीचे कडक व्रत पाळत होता. वृद्ध आई आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन सागर हा काल (शुक्रवारी) सायंकाळी वाड्यावरील अन्य धोंड भक्तगणांसमवेत जत्रेला गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मामा होता. मात्र, सागर जत्रा आटोपून घरी परतलाच नाही. वृद्ध आईवर आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. शिरगाव येथील दुर्घटनेत सागरचा बळी गेल्याने संपूर्ण माठवाडा परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT