Goa Stampede, Lairai Jatrotsav Stampede Danik Gomantak
गोवा

Goa Stampede: शिरगाव दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन हेल्पलाईन सक्रिय; CM सावंत, LOP आलेमाव यांनी केली जखमींची विचारपूस

Lairai Jatrotsav Stampede: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि डिचोली रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Sameer Panditrao

शिरगाव: गोव्यातील देवी लईराईच्या यात्रेत झालेल्या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे .

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि डिचोली रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सदर घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोबत तीन दिवस सगळे सरकारी कार्यक्रम स्थगित करणार असल्याबाबतची माहितीही त्यांनी दिली.

आमदार डॉ. चंद्रकांत ​​शेट्ये आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आयएएस डॉ. स्नेहा गित्ते यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह म्हापसा रुग्णालयाला भेट दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार वीरेश बोरकर यांनी जीएमसीला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

१०८ रुग्णवाहिका सेवेसोबत, आपत्कालीन हेल्पलाइन १०४ सक्रिय करण्यात आलेली आहे. जीएमसीमधील सर्व विभाग प्रमुखांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे ८० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी १३ जण सध्या जीएमसीमध्ये दाखल आहेत.

यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत, तर उर्वरितांवर विशेष आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकेतैनात करण्यात आलेली आहेत आणि डॉक्टरांकडून नियमित अपडेट मिळत आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेली आहे.

श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी शिरगावात उसळणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आलेली होती. संपूर्ण शिरगाव परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता तसेच ‘ड्रोन’चा वापर करून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT