
what happened at Goa stampede: शिरगाव येथील श्रीदेवी लईराई जत्रोत्सवात सहा भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. ३ मे रोजी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेत ४० पेक्षा अधिक भाविक जखमी असल्याची माहिती समोर आलीये. या घटनेबद्दल बोलताना प्रत्यक्षदर्शींनी पोलीस प्रशासनाचा दुर्लक्षितपणा, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झालेली चेंगराचेंगरी आणि धोंडांच्या बेजबाबदारपणाला प्रमुख कारण म्हटले आहे.
थिवी येथील महादेव आंबेकर नावाच्या एका इसमाने दिलेल्या माहितीनुसार, श्री लईराईच्या उत्सवाच्या दरम्यान भाविकांची तुडुंब गर्दी होती. या जत्रोत्सवात धोंड आगीच्या होमकुंडात प्रवेश करतात आणि हेच जत्रेचे प्रमुख आकर्षण देखील आहे, मात्र शुक्रवारी झालेल्या दुर्दैवी घटनेत धोंडांनी एकमेकाला ढकलायला सुरुवात केली, या धक्काबुक्कीच्या प्रकारात भाविक महिला देखील खाली पडल्या मात्र याची दखल कोणीही घेतली नाही.
धोंड त्यांच्यावरून चालत पुढे निघून गेले. छातीवर किंवा गळ्यावर पाय पडल्याने एका महिलेचा मृत झाल्याचं देखील त्यांनी सांगतलं आहे. जत्रेच्या दरम्यान होमकुंडात पडून कुणाचाही मृत्यू झालेला नाही, चेंगराचेंरी आणि परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याने हा दुःखद प्रसंग घडल्याचं त्यांनी सांगितलं.
काही प्रत्यक्षदर्शी धोंडांनी दिलेल्या माहितीनुसार शिरगाव येथील जत्रेच्या उत्सवात धोंड धावून येणाऱ्या वाटेवर उतरतीलाच एक राजुची दोरी बांधलेली होती, या दोरीला अडकून लोकं कोलमडून पडली आणि धोंडांचा मोठा जमाव त्यांच्यावरून चालत पुढे निघून गेला.
या घटनेत कित्यकजणं जखमी झाले आणि केवळ निष्काळजीपणामुळे एवढी मोठी घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जखमी लोकांच्या मदतीसाठी पोलिसांना हाक दिली तरीही पोलीस मदतीसाठी आले नाहीत, मात्र त्यावेळी जर का पोलिसांनी ताबडतोब पावलं उचलली तर कदाचित एवढी मोठी जीवितहानी झाली नसती असं रामा गावकर नावाच्या एका धोंडचं म्हणणं आहे.
जखमी लोकांना मदत करत हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यात मदत केल्याचं शुभम आणि रामा नावाच्या धोंडांनी सांगितलं. शिरगाव येथील श्रीदेवी लईराईची जत्रा हा गोव्यातील प्रसिद्ध उत्सव आहे, आणि यासाठी योग्य व्यवस्थापनची गरज आहे असं म्हणत त्यांनी मंदिराचे प्रशासन आणि पोलीस यांच्या दुर्लक्षिणपणा आणि व्यवस्थापनातील त्रुटींना त्यांनी जबाबदार ठरवलं आहे.
पोलिसांची मोठी फौज तैनाद करून देखील काही क्वचित अधिकारीच घटनास्थळी उपस्थित होते, जखमी लोकांना त्यांच्याप्रमाणेच स्थानिकांनी मदत करत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची धडपड केल्याचं शुभम आणि रामा नावाच्या धोंडांनी सांगितलं. श्रीदेवी लईराईची जत्रा हा गोव्यातील प्रसिद्ध उत्सव आहे, आणि यासाठी योग्य व्यवस्थापनची गरज आहे असं म्हणत त्यांनी मंदिराचे प्रशासन आणि पोलीस यांच्या दुर्लक्षिणपणा आणि व्यवस्थापनातील त्रुटींना त्यांनी जबाबदार ठरवलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.