Goa Shigmo Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmo Festival: डिचोलीत शिमगोत्सवाचा जल्लोष; सर्वत्र उत्साह, घुमचे कटर घूम; परंपरा, श्रद्धा आणि जल्लोषाचा संगम

Shigmo Festival Bicholim 2026: बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारा आणि रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सव सध्या डिचोली तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारा आणि रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सव सध्या डिचोली तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. उद्या सोमवारी होळी पौर्णिमेच्या रात्री होळी पेटविल्यानंतर गावोगावी पारंपरिक पद्धतीने या उत्‍सवाला सुरुवात होईल.

डिचोली तालुक्यातील साळ, लाडफे, बोर्डे, सर्वण, डिचोली, कुडचिरे, मये आदी भागात शिमगोत्‍सव परंपरेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. उद्या सोमवारी रात्री होळीचे पूजन व अन्य पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर गावागावांत शिमगोत्‍सवाचा माहोल रंगणार आहे. या पारंपरिक उत्सवासाठी देवस्थान समित्या, गावकरी तसेच तरुण मंडळी सज्ज झाली आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात शिमगोत्‍सवाची वेगळी छटा पाहायला मिळते. बहुतांश सर्व भागांत चोरोत्सव, शबय, रोंबाट आदी पारंपरिक प्रकार सादर केले जातात. या कार्यक्रमांतून स्थानिक लोकपरंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवला जातो.

दरम्‍यान, शिगमोत्सव हा केवळ रंगांचा उत्सव नसून तो गोमंतकीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. डिचोली तालुक्यात यंदाही हा उत्सव उत्साह, भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण घोडेमोडणी आकर्षण

बोर्डे, गावकरवाडा-डिचोली, लाडफे, सर्वण, कुडचिरे आणि मये या भागांतील शिमगोत्‍सवचे मुख्य आकर्षण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण घोडेमोडणी. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे या घोडेमोडणीला विशेष मान आहे.

प्रत्येक गावाची घोडेमोडणी ही त्या गावाच्या शिमगोत्‍सवाची ओळख मानली जाते. शिवाय बोर्डे, सर्वणसह काही निवडक भागांत होमकुंड उत्सव साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धा आणि विधींच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होतो.

नऊ दिवस गावागावांत असणार धूम

शिमगोत्सवासाठी गावागावांतील देवस्थान समित्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. ढोल-ताशे व इतर चर्मवाद्यांची दुरुस्ती करून त्यांची जमवाजमव करण्यात आली आहे. होळी पेटवल्यानंतर गावागावांत ढोल-ताशांचा ‘घुमचे कटर घूम’ असा निनाद सुरू होणार असून वातावरणात उत्साहाचे स्वर गुंजणार आहेत.

त्या-त्या भागातील शिमगा संपल्यानंतरच हा निनाद शांत होतो. डिचोलीतील बहुतेक भागांत तब्बल नऊ दिवस शिगमोत्सव साजरा केला जातो. या काळात धार्मिक विधी, पारंपरिक नृत्य-गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT