Horoscope: धनत्रयोदशीला लक्ष्मी-कुबेराची विशेष कृपा! 'या' राशींचे नशीब चमकणार; धनलाभासह नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Horoscope Today November 6, 2026: कार्तिक महिन्यातील धनत्रयोदशीचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
Horoscope Today November 6, 2026
Horoscope Today November 6, 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कार्तिक महिन्यातील धनत्रयोदशीचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. सुख-समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि घरात भरभराट व्हावी, यासाठी भाविकांकडून विशेष पूजा-अर्चना केली जाते. आज शुक्रवार असून धनत्रयोदशीसोबतच शुक्र प्रदोष व्रताचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. आज काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींना नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. काहींसाठी नवीन संधींची दारे उघडतील, तर काहींना महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी लागेल. चला तर जाणून घेऊया, मेष ते मीन या १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.

मेष राशी : रखडलेली कामे मार्गी लागणार; कुटुंबाची मिळेल साथ

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कौटुंबिक कामे पूर्ण होऊ शकतात. भविष्यातील नियोजनासाठी आजचा दिवस चांगला ठरेल. एखादे महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. मित्रपरिवार आणि जोडीदाराच्या पाठिंब्याचे महत्त्व आज तुम्हाला जाणवेल. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन कल्पना सुचू शकतात. संयमाने आणि सकारात्मक विचारांनी काम केल्यास अडचणींवर मात करता येईल. आरोग्याची साथ मिळाल्याने उत्साह कायम राहील.

वृषभ राशी : व्यवसायात नफ्याची संधी; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात नेहमीपेक्षा चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी काही नवीन पर्याय समोर येऊ शकतात. त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास यश मिळू शकते.

मिथुन राशी : आनंदाची बातमी मिळणार; व्यवसायात वाढ होण्याचे संकेत

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी राहू शकतो. नवीन गोष्टी शिकण्याची आणि काहीतरी वेगळे करण्याची इच्छा निर्माण होईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असून आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळाल्याने मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. विनाकारण वाद घालणे टाळा आणि कामात सावधगिरी बाळगा.

कर्क राशी : नोकरी बदलण्याचा विचार प्रत्यक्षात येणार? कुटुंबाच्या सल्ल्याने घ्या निर्णय

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर नवीन संधींची माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्यात यश मिळेल. जोडीदाराची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आवडणारी भेटवस्तू देण्याचा विचार करू शकता. मात्र, महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Horoscope Today November 6, 2026
Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

सिंह राशी : रखडलेली कामे पूर्ण होणार; वैवाहिक आयुष्यात वाढणार आनंद

सिंह राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात चांगला अनुभव येऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. व्यवसायात कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्याने नवीन कामे पुढे नेता येतील. नोकरीच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. करिअरविषयी काही संभ्रम निर्माण झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस चांगला ठरू शकतो.

कन्या राशी : आर्थिक स्थिती मजबूत होणार; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरू शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा वेळ योग्य आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास यश मिळवणे सोपे होईल. सरकारी किंवा प्रशासकीय कामे करताना थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे संयम बाळगा. नवीन अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. मुलांच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

तुळ राशी : नोकरीत प्रमोशनचे संकेत; व्यवसायातून मिळू शकतो मोठा फायदा

तुळ राशीच्या व्यक्तींच्या मनात आज अनेक नवीन कल्पना येऊ शकतात. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र, भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक अभ्यास करा. व्यापारातून चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. संगीत आणि कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तींना समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी : मालमत्तेत गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर योग्य माहिती घेऊन पुढे जा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामातील चांगल्या कामगिरीमुळे विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्राकडून अचानक फोन किंवा एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

धनु राशी : धार्मिक कार्यात वाढणार सहभाग; समाजात प्रतिष्ठा उंचावण्याची शक्यता

धनु राशीच्या व्यक्तींचा आज धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढू शकतो. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग वाढेल. त्यामुळे समाजात मान-सन्मान मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी दिवस चांगला ठरू शकतो. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वडिलांना मदत केल्याने त्यांना आनंद होईल. मात्र, खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधांमध्ये विवाहासंबंधी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात.

मकर राशी : पगारवाढीची शक्यता; वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होणार

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होण्याची शक्यता आहे. पगारवाढ किंवा आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. त्यांच्या कामगिरीचा भविष्यातील करिअरला फायदा होऊ शकतो. व्यवसायातही आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या पैशातून काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो.

Horoscope Today November 6, 2026
Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

कुंभ राशी : सामाजिक कार्यात सहभाग वाढणार; स्पर्धा परीक्षार्थींना यशाचे संकेत

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक राहू शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता येईल. जवळच्या मित्राशी संवाद झाल्याने मन प्रसन्न होईल. कौटुंबिक विषयांवर जोडीदारासोबत चर्चा होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन संगणक अभ्यासक्रम शिकण्याचा विचारही मनात येऊ शकतो. आरोग्यात सुधारणा जाणवेल. मात्र, आज दूरच्या प्रवासाचे नियोजन टाळणे हिताचे ठरू शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वेळेची वाट पाहा.

मीन राशी : नोकरीत प्रगतीचे संकेत; नवीन ओळखी भविष्यात ठरणार फायदेशीर

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहपूर्ण राहण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून पदोन्नतीसंदर्भात सकारात्मक निर्णय मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षण आणि करिअरविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकते. मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा आणि आनंदाचे क्षण घालवण्याचा योग आहे. नवीन व्यक्तींशी ओळख निर्माण होईल. या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना आई-वडिलांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.