Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

Cristiano Ronaldo International Football Retirement: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या 23 वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अखेर पूर्णविराम देत राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली.
Cristiano Ronaldo Retirement
Cristiano Ronaldo RetirementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cristiano Ronaldo International Football Retirement: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या 23 वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अखेर पूर्णविराम देत राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडिओ शेअर करत 41 वर्षीय रोनाल्डोने आपल्या या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 2003 मध्ये पदार्पण केल्यापासून परिधान केलेली पोर्तुगालची आयकॉनिक 7 नंबरची जर्सी आता तो कायमची सोडत आहे.

पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणे हा केवळ फुटबॉल खेळापेक्षाही खूप मोठा अनुभव होता, अशी भावना व्यक्त करत त्याने हा निर्णय घेणे आपल्यासाठी अत्यंत कठीण असल्याचे म्हटले. 'पोर्तुगाल सदैव माझ्यासोबत राहील,' अशी भावनिक प्रतिक्रिया देत त्याने आपण देशासाठी सर्वस्व दिल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांत पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जिसस यांच्यासोबत झालेल्या वादानंतर रोनाल्डोचा हा निर्णय समोर आला. ऑक्टोबर महिन्यात नेशन्स लीग स्पर्धेदरम्यान नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. प्रशिक्षकाने आपल्याला 30 मिनिटे खेळवण्याचे वचन देऊन ते पाळले नाही, असा आरोप करत रोनाल्डोने कॅम्प सोडला होता. जरी नंतर त्याने संघसहकारी आणि चाहत्यांची माफी मागितली असली, तरी या घडामोडींमुळे त्याच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेरीस दोन दशकांहून अधिक काळ पोर्तुगाल (Portugal) फुटबॉलचा चेहरा राहिलेल्या रोनाल्डोने आपल्या या प्रवासाची यशस्वी समाप्ती केली.

Cristiano Ronaldo Retirement
Cristiano Ronaldo Wedding: रोनाल्डो अडकला लग्नबंधनात! 10 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर जॉर्जिनियासोबत उरकलं लग्न; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय कारकीर्द विक्रमांनी भरलेली असून, त्याने ऑगस्ट 2003 मध्ये कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. पुरुष आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्याने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. पोर्तुगालसाठी 234 सामन्यांमध्ये सर्वाधिक 146 गोल करण्याचा अद्वितीय विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने 2016 ची युरो स्पर्धा आणि 2019 तसेच 2025च्या नेशन्स लीगचे ऐतिहासिक किताब जिंकले.

Cristiano Ronaldo Retirement
Cristiano Ronaldo In Goa: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी! फुटबॉलचा जादुगार 'रोनाल्डो' गोव्यात खेळणार

तसेच 2026च्या फिफा विश्वचषकात सलग सहा वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. पोर्तुगालचा अध्याय संपला असला, तरी सध्या अल नासिरकडून खेळणारा रोनाल्डो आपल्या करिअरमधील 1 हजार गोलच्या ऐतिहासिक टप्प्यापासून केवळ काही पावले दूर असून, त्याची ही विक्रमी मोहीम क्लब स्तरावर सुरुच राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.